घरमुंबईतिवरे दुर्घटनाग्रस्तांचे संसार सिद्धिविनायक न्यास उभारणार!

तिवरे दुर्घटनाग्रस्तांचे संसार सिद्धिविनायक न्यास उभारणार!

Subscribe

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले. मात्र आता या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायक मंदिर न्यास धावून आले आहे.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण दुर्घटनेत अनेकांचे संसार उध्वस्त झाले. मात्र आता या दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला सिद्धिविनायक मंदिर न्यास धावून आले असून, या गावातील उध्वस्त झालेल्यांचे संसार पुन्हा उभे रहावे, यासाठी आता ज्यांची घरे पडली त्यांची घरे पुन्हा नव्याने बांधून देणार असल्याची माहिती सिद्धिवानायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे. इतकेच नाही तर तिवरे गावातील शाळा देखील सिद्धीविनायक न्यास बांधून देणार आहे. दरम्यान, शरद पवार यांनी ८ जुलै रोजी तिवरे धरणग्रस्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचे सांगत यामध्ये लोकांची घरे, पीकं आणि शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. राज्य सरकारने पीडितांना दिलेली ४ लाखांची मदतही तुटपुंजी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी पुणे जिल्ह्यातील माळीण गावाप्रमाणे येथील लोकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती. मात्र आता या धरणग्रस्तांच्या मदतीला आता सिद्धिविनायक मंदिर न्यास धावून आले आहे.

तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांना सिद्धीविनायक न्यासाकडून मदतीचा हात – आदेश बांदेकर

तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांना सिद्धीविनायक न्यासाकडून मदतीचा हात – आदेश बांदेकर

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಜುಲೈ 15, 2019

- Advertisement -

काय म्हणाले आदेश बांदेकर? 

तिवरे धरण दुर्घटनेत अनेक संसार उध्वस्त झाले. अशावेळी त्या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या वतीने घेण्यात आला आहे. भरीव असा निधी यासाठी ठेवण्यात आला असून, मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

अनाथ गतीमंद मुलांचे संगोपन न्यास करणार 

महाराष्ट्रातील सर्व अनाथ गतीमंद मुलांचे संगोपन आता सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार आहे. ज्या अनाथ गतीमंद मुलांना कुणाचाच आधार उरला नाही, अशा सर्व गतीमंद मुलांचं संगोपन आता सिद्धीविनायक मंदिर न्यास करणार आहे. आई-वडिलांनंतर या गतीमंद मुलांना कुणाचाच आधार नसतो. हे गतीमंद मुलं पूर्णपणे परावलंबी असतात. त्यामुळे आई-वडिलांनंतर त्यांची प्रचंड वाताहत होते. त्यामुळेच अशा अनाथ गतीमंद मुलांवर आता सिद्धीविनायक मंदिर न्यासाने वडिलकीचं छत्र धरले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

बुलढाणामध्ये दोन बालकांचा कारमध्ये गुरमरुन मृत्यू

दलित पँथरचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -