घरमुंबई‘सायन फ्लायओव्हर’ वाहतुकीसाठी बंद

‘सायन फ्लायओव्हर’ वाहतुकीसाठी बंद

Subscribe

सायन फ्लायओव्हर दुरुस्तीच्या कामासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.

मुंबई पूर्व उपनगरातला वाहतुकीचा कणा असलेला सायन फ्लायओव्हरच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मे महिन्यापासून सुरू होत आहे. या कामासाठी सायन फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वाशी, नवी मुंबई आणि पुढे पुण्याला जाण्यासाठी सायन उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून २००३ सालापासून वाहतुकीसाठी सुरू झालेल्या या उड्डाणपुलाचे काही महिन्यांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यानुसार, उड्डाणपुलाचे बेअरिंग तातडीने बदलण्याची गरज व्यक्त करण्यात आली. सायन फ्लायओव्हरच्या दुरूस्तीच्या कामाअंतर्गत एकूण १७० बेअरींग बदलण्यात येणार आहेत. ही गरज लक्षात घेत, एमएसआरडीसीने वाहतूक विभागाशी चर्चा करून मेपासून दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी करण्यात आली वाहतूक बंद

सायन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट गेल्या वर्षी आयआयटी मुंबई मार्फत करण्यात आले होते. आयआयटीच्या अहवालात उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार, महामंडळाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. वाहतूक नियोजनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांबरोबर बैठका पार पडल्या असून बेअरिंग बदलण्यात येणार असल्याने तोपर्यंत खबरदारांची उपाययोजना म्हणून उड्डाणपुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्याबाबत वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले आहे. हा उड्डाणपूल बंद झाल्यास वाहतूककोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र, ही दुरुस्ती उड्डाणपुलाच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे मुंबईकरांनी सहकार्य करावे, असे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे.

- Advertisement -

एप्रिल महिन्यात होणार होती दुरुस्ती

सायन उड्डाणपुलाचे उड्डाणपूल २० एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता. मात्र, आता तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुरुस्तीच्या कामानिमित्त वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.


वाचा – सायन-पनवेल महामार्गावरील कोंडी फुटणार

- Advertisement -

वाचा – मुंबईतील उड्डाणपुलांच्या मोकळ्या जागेत फुलणार बगीचे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -