‘भिती’मुळे आम्हालाच मानसोपचाराची गरज; शीव हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मागणी

रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं असून निवासी डॉक्टरांनी आता स्वतःचं समुपदेशन करून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे रांगा लावायला सुरूवात केली आहे.

Mumbai
Sion Hospital Doctors demanded psychiatric treatment
मानसोपचार तज्ज्ञांकडे डॉक्टरांच्या रांगा

मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटलमधील एका निवासी डॉक्टराला मारहाण झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. रुग्णांच्या नातेवाईकांकडून वारंवार होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं आहे. हे लक्षात घेऊन पालिकेच्या शीव हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी आता स्वतःचं समुपदेशन करून घेण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे रांगा लावायला सुरूवात केली आहे.


हेही वाचा – डॉक्टरांना मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात डॉक्टरांची ‘Save Doctor’s मोहीम


सोमवारी लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा रूग्णांच्या २५ नातेवाईकांनी डॉक्टरांना घेरल्याची घटना घडली होती. त्यांच्यासोबत, झालेल्या बाचाबाचीची तक्रार केली गेली नसली तरी या प्रकरणामुळे इथले निवासी डॉक्टरांमध्ये प्रचंड नैराश्य आले असून त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडे रांगा लावण्यात आल्या आहेत.

नेमकं काय घडलं ?

एका सत्तर वर्षीय महिलेला प्रकृती बिघडल्यानं पालिकेच्या शीव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तब्येत खालावत गेल्याने महिलेचा मृत्यू झाला. पण डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत मृत रुग्णांच्या २० ते २५ नातेवाईकांनी निवासी डॉक्टराला धक्काबुक्की करायला सुरूवात केली. डॉक्टर वॉर्डमध्ये उपस्थित नसल्याने आमच्या माणसाचा मृत्यू झाला, असा आरोप करत मेडिसीन विभागाच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना घेरले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकही काही करू शकले नाहीत. पण, त्या प्रसंगामुळे निवासी डॉक्टर प्रचंड धस्तावले आहेत.

या घटनेची एफआयआर दाखल करण्याची आणि त्याबाबतची निःपक्षपाती चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करत असल्याचे स्थानिक सायन मार्डकडून सांगण्यात आले आहे. पण, या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे निवासी डॉक्टर वैयक्तिक पातळीवर एफआयआर दाखल करणार असल्याची माहितीही दिली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्वतंत्र कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

एका वृद्ध महिलेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृतीत खूपच बिघडल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांना संतापाच्या भरात निवासी डॉक्टराला धक्काबुक्की करत मारहाण केली. डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण नसल्यानं अशा वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे डॉक्टरांमध्ये भितीचं वातावरण तयार झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता मार्डने सर्व निवासी डॉक्टराचे समुपदेशन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मानसोपचार विभागातील ओपीडी क्रमांक २१ मध्ये सर्व निवासी डॉक्टरांनी समुपदेशन करून घेण्यासाठी रांगा लावल्या होत्याडॉ. प्रशांत चौधरी; शीव हॉस्पिटलमधील ‘मार्ड’अध्यक्ष

सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज

शीव हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागात डॉक्टर कार्यरत असलेल्या एका निवासी डॉक्टरला मारहाण झाली आहे. या मारहाणीत कुठलीही दुखापत झालेली नसली तरी हॉस्पिटलमध्ये काम करताना डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील मार्ड संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.


हेही वाचा – नायर हॉस्पिटलमध्ये तणाव; मृतांच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण