घरमुंबईबहिणीने केले भावाला यकृत दान

बहिणीने केले भावाला यकृत दान

Subscribe

मुंबईतील एका बहिणीने आपल्या भावाला जीवंत ठेवण्यासाठी यकृताचा काही भाग रक्षाबंधनाची भेट म्हणून दान केला.. नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये झालेल्या यकृताच्या काही भागाच्या दानामुळे या बहिणीच्या भावाला पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगण्याला उभारी मिळाली आहे.

४१ वर्षीय सुशांत बोराटे मुळचे पुण्याचे असून त्यांच्यावर जानेवारी २०१९ मध्ये ही जीवित यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, आठ महिन्यांत त्यांचे जीवन सुरळीत सुरू झाले. सुशांत बोराटे यांना हेपेटायटिसचे निदान करण्यात आले होते. त्यावर उपचार करण्यासाठी अनेकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, हळूहळू त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला गेला. याविषयी अपोलो हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले, रुग्णाचे यकृत निकामी झाले होते.

- Advertisement -

पण, प्रकृती बिकट होती. त्यांना यकृत प्रत्यारोपणाचा पर्याय दिला होता. पण, मृत व्यक्तीचे यकृत मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार होती. कुटुंबाला अवयवदानाबाबत माहिती असल्याकारणाने त्यांची बहीण यकृतदानासाठी तयार झाली. जीवित दाताच्या यकृत प्रत्यारोपणात यकृताचा काही भाग जिवंत व्यक्तींमधून काढून घेत यकृताचा आजार शेवटच्या टप्प्यात असणार्‍या व्यक्तीमध्ये बसवला जातो. मुत्राशय आणि यकृत हे जीवित दाता अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेचे प्रकार आहेत. जिवंत व्यक्ती त्यांच्या यकृताचा भाग दान करू शकते आणि उर्वरित यकृत नवसंजीवनी मिळवून परत आपला पूर्वीचा आकार प्राप्त करत नेहमीसारखे कार्य करू शकते.

मला बहिणीकडून जीवनाची भेट मिळाली आहे. अशी बहीण मिळाल्याबद्दल मी ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया सुशांत बोराटे यांनी दिली. तर, बहीण शीतल साठवणे यांनी, लहान असताना माझा भाऊ खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिला आणि प्रत्येक संकटातून मला बाहेर काढले. तोच माझ्यासाठी वडिलांसारखा पाठीशी उभा आहे. म्हणून मी यकृताचा भाग दान करायचे ठरवले.

Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -