घरात बसून रेल्वेतून पॉर्सल पाठवा,मोबाईलवर दिसणार पार्सलचा प्रवास!

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अत्याधुनिक पार्सल सुविधा सुरू केली आहे. त्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना आपल्या घरूनच पार्सल दुसर्‍या राज्यात पाठविता येणार आहे.

 रेल्वे गाड्यांमधून एका राज्यातून दुसर्‍या राज्यात पार्सल किंवा वस्तू पाठविण्यासाठी प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागत होते. त्यानंतर त्याची पॉकिंग कशी करायची आणि पार्सल केव्हा पोहचणार याची चौकशी करावी लागत होती. मात्र आता याची गरज राहणार नाही. कारण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अत्याधुनिक पार्सल सुविधा सुरू केली आहे. त्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना आपल्या घरूनच पार्सल दुसर्‍या राज्यात पाठविता येणार आहे. तसेच पॉर्सल कुठेपर्यंत पोहचले याची चौकशी जीपीएस टॅ्रकिंग माध्यमातून आपल्या मोबाईलवर नागरिकांना बघता येणार आहे.

रेल्वेच्या पॉर्सल प्रवाशांची असणार नजर

रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे प्रयत्न करत असून प्रवाशांव्यतिरिक्त महसूल गोळा करण्यासाठी नॉन फेअर योजना रेल्वेने आखली आहे. या योजनेतंर्गत प्रवाशांना एकापेक्षा एक प्रवासी सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वेकडून करण्यात येत आहे. असाच एक प्रयत्न मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे. विदेशाच्या धर्तीवर आता नागरिकांना आपले पॉर्सल रेल्वे गाड्यांमार्फत पाठविता येणार आहे. त्यासाठी नागरिकांना रेल्वे स्थानकावर जाण्याची गरज लागणार नाही. मध्य रेल्वेने आधुनिक पार्सल सुविधासाठी कॉम्प्रेसहेन्सिव्ह लगेज/पार्सल अ‍ॅग्रीगेशन लॉजिस्टिक्स सोल्युशन प्रोव्हायडिंग टेकनॉलोजी कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी नागरिकांना रेल्वेमार्फत पार्सल पाठविण्यासाठी एक मोबाईल अ‍ॅप विकसित करणार आहे. या अ‍ॅपमार्फत नागरिकांना आपले पार्सल जीपीएस बेस्ट बुकिंग करता येणार आहे तसेच अ‍ॅपमध्ये जीपीएस ट्रॅकिंग व डिलिव्हरी सिस्टमी असणार आहे. यामुळे नागरिकांना आपले पार्सल कुठपर्यंत पोहचले आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात याच्या फायदा होणार आहे.

लगेज सुविधा मिळणार

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना सामान घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना सामानाची काळजी घ्यावी लागते. आता प्रवाशांच्या सामान पिकअप आणि ड्रॉप करुन देण्याची सुविधासुध्दा कॉम्प्रेसहेन्सिव्ह लगेज/पार्सल अ‍ॅग्रीगेशन लॉजिस्टिक्स सोल्युशन प्रोव्हायडिंग टेक्लॉलोजी कंपनीने करुन दिली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रवासात सामान घेऊन प्रवास करण्याची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला प्रवासाअगोदर बुकिंग करावी लागणार आहे. त्यासाठी काही ठराविक लगेज दर असणार आहे.

मुंबईत लवकरच सेवा

 सध्या अत्याधुनिक पार्सल सुविधेचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर मध्य रेल्वेच्या नागपूर रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेला या करारातून वार्षिक 5 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. या सेवेचा अभ्यास करुन लवकरच मध्य रेल्वेच्या मुंबई, ठाणे आणि कल्याण रेल्वे स्थानकासहित इतर ठिकाणीही सुविधा लवकरच सुरु करणार आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.