घरमुंबईदोन ज्येष्ठांच्या अवयवदानामुळे सहा जणांना जीवदान

दोन ज्येष्ठांच्या अवयवदानामुळे सहा जणांना जीवदान

Subscribe

मुंबईत सप्टेंबर महिन्यात एकूण ६४ अवयवदान झाल्याचं झेडटीसीसीकडून सांगण्यात आलं आहे. २८ आणि ३० सप्टेंबर या दोन दिवशी झालेल्या अवयवदानामुळे मुंबईत अवयवदानाबाबत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

अवयवदानाबाबत वेगवेगळ्या स्तरावर केल्या जाणाऱ्या जनजागृतीमुळे आता तरुण पिढी पुढाकार घेत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत या महिन्यात अवयवदानाचा आकडा ६४ पर्यंत पोहोचला आहे. त्यानंतर, अजूनही अवयवदान मोठ्या प्रमाणात केलं जात असल्याचं समोर येत आहे. मुंबईत सप्टेंबर महिन्यात एकूण ६४ अवयवदान झाल्याचं झेडटीसीसीकडून सांगण्यात आलं आहे. २८ आणि ३० सप्टेंबर या दोन दिवशी झालेल्या अवयवदानामुळे मुंबईत अवयवदानाबाबत सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. या दोन्ही दिवशी दोन ज्येष्ठ नागरिकांचे अवयव दान करण्यात आले आहेत.

हेही वाचा – अवयव दान, श्रेष्ठ दान; ७० वर्षाच्या व्यक्तिचा आदर्श

- Advertisement -

अवयव दानामुळे दोघांना जीवदान मिळण्यास मदत

२८ सप्टेंबरला ६४ वर्षीय महिलेला काही कारणास्तव परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार केल्यानंतर या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना त्याच दिवशी ब्रेनडेड घोषित केलं. मुलगा आणि मुलीच्या पुढाकाराने त्यांनी त्यांच्या आईचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांचे यकृत, फुप्फुस आणि दोन्ही किडन्या दान करण्यात आल्या आहेत. त्यांच्या मुलांनी हृदय दान करण्याचाही निर्णय घेतला होता. पण, काही कारणास्तव हृदय दान करता आलं नाही, अशी माहिती ग्लोबल हॉस्पिटलचे अवयवदान समन्वयक राहुल वासनिक यांनी दिली आहे. तसंच, दुसरी किडनी एच.एल.रिलायन्स फाउंडेशनमध्ये देण्यात आली आहे. या मातेनं केलेलं अवयव दान हे मुंबईतील ६३ वं अवयवदान ठरलं आहे. दरम्यान, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये ३० सप्टेंबरला ६४ वं अवयवदान झालं. ६५ वर्षीय व्यक्तीच्या अवयव दानामुळे दोघांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. या व्यक्तीने यकृत आणि किडनी दान केली आहे. या व्यक्तीच्या अवयवदानामुळे मुंबईत ६४ वं अवयवदान होण्यास मदत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -