घरमुंबई३ फूट सळी घुसली डोक्यात, ६ वर्षांच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया

३ फूट सळी घुसली डोक्यात, ६ वर्षांच्या मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

खेळता खेळत एक ६ वर्षांची मुलगी ८ फुट उंचीवरून ३ फुटांच्या एका धातूच्या सळीवर पडली. यामध्ये ही लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

तुमची मुलं जर खेळत असतील तर त्यांच्यावर आता काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, चेंबूर परिसरात राहणाऱ्या एका मुलीला खेळणं जीवावर बेतलं आहे. सेजल यादव ही ६ वर्षांची मुलगी ८ फुट उंचीवरून ३ फुटांच्या एका धातूच्या सळीवर पडली. सळी तिच्या डोक्याच्या उजवीकडील पुढच्या बाजूकडून आत गेली आणि ती गंभीर जखमी झाली. तिच्या कुटुंबीयांनी तिच्या डोक्यात गेलेली सळी तिच्या कुटुंबीयांनी तिथेच काढली. त्यानंतर, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथल्या डॉक्टरांनी तिच्यावर तात्पुरते ड्रेसिंग केलं आणि तिला पुढील उपचारांसाठी झेन मल्टि स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. या प्रकरणाबाबतची चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

कवटीचे हाड फ्रॅक्चर

झेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिच्या डोक्याच्या चाचण्या केल्या तेव्हा कळलं की डोक्याच्या पुढील बाजूस कवटीचे हाड फ्रॅक्चर होऊन त्यातून मेंदूचा काही भाग बाहेर आला होता. सीटी स्कॅनमध्ये दिसून आले की, डोक्याच्या पुढील बाजूकडील कवटीचे हाड फ्रॅक्चर झाले असून रॉड जिथून आत शिरला होता तिथे रक्त साचले होते. तिच्यावर तात्काळ शस्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यानुसार, झेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मध्यरात्री त्या मुलीवर १.५-२ तासांची शस्त्रक्रिया केली.

- Advertisement -

उपचारांसोबत स्कॉलरशीपही

काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतर ती शुद्धीत आल्यानंतर १० दिवसांनी तिला डिस्चार्ज देण्यात आला. शिवाय, रुग्णालयाने तिच्या शिक्षणासाठी ७५ हजार रूपयांची स्कॉलरशीपही जाहीर केली.

रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तिच्या शरीराची डावी बाजू थोडी कमजोर आहे. मात्र तिला चालताना पाहून खूप आनंद वाटतो आहे. शस्त्रक्रियेनंतर काही समस्या तर नाही ना यासाठी पुढील ४ आठवडे तिच्या मेंदूची तपासणी केली जाईल.
– डॉ. बटुक डियोरा, न्यूरोसर्जन, झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालय
झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणाले, आपली मुलं कुठे खेळत आहेत, याबाबत पालकांना माहिती हवी. आपल्या परिसरातील धोक्याच्या ठिकाणी मुलं खेळणार नाहीत याची दक्षता घ्यायला हवी.
– डॉ. रॉय पाटणकर, झेन मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक

सेजलच्या पालकांनी डॉक्टरांचे मानले आभार

सेजलचे पालक म्हणाले, “आमची मुलगी बरी झाली आणि आता ती पुन्हा खेळू लागली, यासाठी आम्ही डॉक्टर आणि रुग्णालयाचे आभार मानतो. अशा धोकादायक ठिकाणी तुमची मुलं खेळणार नाहीत, याची काळजी घ्या असं आवाहन आम्ही सर्व पालकांना करत आहोत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -