‘त्या’ आरोपीला कठोर शिक्षा व्हावी; मनसेची मागणी

कुर्ला परिसरात एका सहा वर्षाच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केलयाची घटना घडली असून याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

minor girl murder two year old girl at Murbad
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

हैदराबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनसे सरचिटणीस रिटाताई गुप्ता, मनविसे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, उजाला यादव, मनसे विभाग अध्यक्ष नरेश केणी, मिलिंद चव्हाण, शाखाअध्यक्ष मनोहर आपटे, अभय थळी यांनी रूग्णालयात जाऊन पिडीत चिमुकलीची विचारपूस केली आहे.

बालात्काराच्या घटनेत वाढ

हैदराबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ६ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईत मुली आणि महिला कितपत सुरक्षित आहेत? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. मुंबई सारख्या शहरात अशाप्रकारची घटना घडणे ही लाजिरवाणी बाब आहे. मुंबईत महिला अधिक सुरक्षित असल्याचा दावा केला जातो. मात्र, गेल्यावर्षी म्हणजे २०१८-१९ या वर्षादरम्यान मुंबईत बालात्काराच्या २२ टक्के तर विनयभंगाच्या गुन्ह्यांमध्ये ५१ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – धक्कादायक! मुंबईत ६ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार