कांदिवलीत महापालिका बांधणार स्कायवॉक

बोरीवली, दहिसरमध्ये जुने सात पूल पाडून त्या जागी नव्याने पूल बांधण्यात येणार आहेत. यामध्ये सहा पुलांचा तर एका नव्याने बांधण्यात येणार्‍या स्कायवॉकचा समावेश असणार आहे.

Mumbai
BMC ranks Worli 'cleanest ward' in mumbai
'वरळी'ला मिळाला मुंबईतील स्वच्छ वॉर्ड पुरस्कार

बोरीवली आणि दहिसरमध्ये जुने सात पूल पाडून त्या जागी नव्याने पूल बांधण्यात येणार आहे. यामध्ये सहा पुलांचा तर एका नव्याने बांधण्यात येणार्‍या स्कायवॉकचा समावेश आहे. एकाबाजुला वापर होत नसल्याने तसेच त्याचा दुरुपयाग केला जात असल्याने दहिसरमधील स्कायवॉक पाडण्याची मागणी होत आहे. तसेच काही स्कायवॉक निरुपयोग ठरल्याने ते पाडून टाकण्याचा प्रयत्न होत असतानाच आता कांदिवली पश्चिम शताब्दी अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ते बोरसा पाडा येथील प्रविण संघवी रोड येथे नव्याने स्कायवॉक बनवण्यात येत आहे. यासाठी सुमारे ३९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तब्बल ८२५ मीटर लांब या स्कायवॉकचे बांधकाम होणार आहे.

११७ कोटी रुपये करणार खर्च

दहिसर आणि बोरीवली आदी भागांमध्ये सहा पूल धोकादायक झाल्यामुळे तो बंद करण्यात आला आहे. येथील धसकवाडी नाल्याचे रुंदीकरण करण्यात आले असून या परिसरातील पावसाळ्यातील पूरसदृश्य परिस्थिती टाळण्यासाठी आणि एन.एल.कॉम्प्लेक्स मधील सुधारित नाल्याच्या रुंदीची जुळवाजुळव करण्यासाठी चार पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रुस्तमजी शाळेजवळ आणि आनंदनगर दहिसर नदीवर नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय एस.व्हि.रोड आणि कांदिवली रेल्वे स्टेशन पश्चिम ते बोरसा पाडा रोडच्या जंक्शनवर स्कायवॉक बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची निवड करण्यात आली. यासाठी ११७ कोटी रुपयांच्या या कंत्राट कामांसाठी स्पेको इन्फ्रास्ट्क्चर कंपनीची निवड करण्यात आली आहे.

पुलांची नावे

नरेंद्र पार्क बिल्डींगजवळील पूल
प्रतापराव गुज्जर रोड मिले स्टोन जवळ
बर्हिजी नाईक मार्ग,सिध्दी विनायक बिल्डींगजवळ
दहिसर नदी,रुस्तमजी शाळेजवळ
दहिसर नदी, आनंदनगर ते प्रमिला नगर जोडणारे
कांदिवली एस.व्ही.रोड ते बोरसापाडा जंक्शनजवळ स्कायवॉक


हेही वाचा – स्कायवॉक वरील जाहिरात ठेक्यात गोलमाल?