घरमुंबईझोपडपट्टीधारकांना  एसआरएचा आसरा

झोपडपट्टीधारकांना  एसआरएचा आसरा

Subscribe

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेमध्ये विकासकाकडून झोपडीधारकांची होणारी फसवणूक, भ्रष्टाचार तसेच प्रकल्पाची इत्थंभूत माहिती झोपडीधारकांना मिळावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) ‘आसरा’ हे नवे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात येणार आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेमध्ये विकासकाकडून झोपडीधारकांची होणारी फसवणूक, भ्रष्टाचार तसेच प्रकल्पाची इत्थंभूत माहिती झोपडीधारकांना मिळावी यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) ‘आसरा’ हे नवे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप येत्या आठवड्यात नागरिकांच्या सेवेत येईल. यामुळे प्रकल्पातील पारदर्शकता वाढवण्यास मदत होईल. त्यामुळे प्रकल्प राबवण्यातील अडचणी दूर होतील. मुंबईमध्ये एसआरएमार्फत राबवण्यात आलेल्या बहुतांश प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप नेहमीच होत असतात. अनेक प्रकल्पांमध्ये विकासकांकडून झोपडीधारकांची फसवणूक करण्यात येते. यामुळे झोपडीधारक व विकासक यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन प्रकल्प रखडल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे एसआरएची प्रतिमा मलिन झाली आहे. एसआरएच्या कार्यात पारदर्शकता, कार्यक्षमता आणण्यासाठी तसेच पुनर्वसन प्रकल्पामध्ये सहभागी होणार्‍या नागरिकांना आपल्या प्रकल्पाबाबत परिपूर्ण माहिती मिळावी यासाठी एसआरएतर्फे ‘आसरा’ हे मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात येत आहे.

‘आसरा’ अ‍ॅपचा वापर सर्वसामान्यांनाही करता यावा यासाठी हे अ‍ॅप मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असणार आहे. अ‍ॅपचा वापर करण्यासाठी जीपीएसची आवश्यकता असणार आहे. जीपीएसच्या वापरामुळे झोपडीधारकांना वस्तीतील सर्व झोपडीधारकांची नावे, पत्ता व जागेबाबतची इत्थंभूत माहिती मिळणार आहे. तसेच ते राहत असलेली वस्ती ही झोपडपट्टी म्हणून जाहीर झाली आहे का? या विषयी अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. दहिसर रावळपाडा येथील मोरेश्वर नगरचा एसआरए प्रकल्प गेली 12 वर्षे रखडला असून त्यामुळे 430 कुटुंब उघड्यावर  पडली आहेत. हा प्रकल्प हाती घेणार्‍या 4 विकासकांपैकी 3 जणांनी माघार घेतल्यामुळे प्रकल्पग्रस्तांची वाताहत झाली आहे.

- Advertisement -

झोपडपट्टीच्या पुनर्वसनाबाबत राबवण्यात येणारी योजना, विकासकाने सादर केलेला प्रस्ताव, तसेच प्रकल्पाला ‘एलओआय’सह लागणार्‍या अन्य परवाने मिळाले आहेत की नाही याची सर्व माहिती अ‍ॅपद्वारे झोपडीधारकांना सहज मिळणार आहे. एसआरएमधून प्रकल्पाला मिळालेली परवानगी, पात्र-अपात्र, प्रस्ताव ही माहिती मिळवण्यासाठी नागरिकांना माहिती अधिकाराचा वापर करावा लागत होता. पण यापुढे ही माहिती ‘आसरा’ अ‍ॅपवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे माहिती अधिकाराचा वापर कमी होण्यास मदत होणार आहे. झोपडीधारकांना जिल्हा, तालुका, विभाग, गाव, स्लम क्लस्टर, स्लम डिक्लरेशन थ्री सी, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, झोपडीचे ओळखपत्र अशी माहिती जीआयएस तंत्रज्ञानाच्या आधारे बनवण्यात आलेल्या या मोबाईल अ‍ॅपद्वारे मिळणार आहे. सध्या ही माहिती मुंबई महापालिकेच्या परिक्षेत्रातील झोपडपट्टीबाबत असणार आहे, अशी माहिती एसआरएमधील एका अधिकार्‍याने दिली.

  पाच महिन्यांच्या  अथक मेहनतीनंतर एसआरएचे ‘आसरा’ हे मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या मोबाईल अ‍ॅपवर एसआरएसंदर्भातील सर्व माहिती नागरिकांना सविस्तर उपलब्ध होणार आहे. हे अ‍ॅप आम्ही येत्या आठवड्यात नागरिकांच्या सेवेत आणणार आहोत.
– दीपक कपूर, सीईओ एसआरए 

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -