Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी प्रकरणी दोघांना अटक

दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी प्रकरणी दोघांना अटक

दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी प्रकरणी दोघांना कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे.

Related Story

- Advertisement -

दुर्मिळ जातीच्या मांडूळ सापाची तस्करी प्रकरणी दोघांना कांदिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. सुनिल मारुती माने आणि संतोष रामचंद्र अहिरे अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक मांडूळ जप्त केले आहे. या मांडूळाची किंमत एक कोटी ६० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

एक कोटी ६० लाखांचे मांडूळ

कांदिवलीतील महावीरनगर परिरसरात काही तरुण मांडूळ या दुर्मिळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दिपक हिंडे यांना मिळाली होती. वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पोंदकुले यांच्या मार्गदर्शनाखाली रवी अडाणे, विलास कदम, दिपक हिंडे, वैभव पवार, पय्यर, गिलबिले, सकपाळ, चौगुले यांनी काल, रविवारी सायंकाळी महावीरनगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे सुनिल माने आणि संतोष अहिरे हे दोघेही आले होते. त्यांची हालचाल संशयास्पद वाटताच या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलिसांना एक मांडूळ सापडले. या मांडुळाची किंमत एक कोटी साठ लाख रुपये आहे. मांडूळ जातीचा हा साप अतिशय दुर्मिळ असून त्याचा वापर जादूटोणा तसेच औषधी तयार करण्यासाठी केला जातो. मांडूळ सापाला विदेशात प्रचंड मागणी आहे. त्यामुळे विदेशात अशा मांडुळाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या दोघांची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून त्यांनी यापूर्वीही मांडुळाची विक्री केली आहे का, याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisement -