कर्करोग-मधुमेहावर सर्पविषातून उपचार शक्य

कर्करोग-मधुमेहावर सर्पविषातून आता उपचार करणे शक्य झाले आहे.

Mumbai
Snake venom used Cancer-Diabetes Treatment
कर्करोग-मधुमेहावर सर्पविषातून उपचार शक्य

नाइलाज वाटणारी कर्करोगाची अवस्था, सतावणारा मधुमेह अशा अनेक आजारांची औषधं सापाच्या विषापासून तयार केली जातात. जागतिक बाजारपेठेत ही औषधं उपलब्ध आहेत. भारतात अद्याप त्याचा विचार कोणतीही संशोधन संस्था करताना दिसून येत नाही. पण, हाफकिनच्या राष्ट्रीय विष संशोधन केंद्रात आता यावर संशोधन होणार आहे. यामुळे सर्प विषाचा अभिनव उपयोग होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सर्प दंशावरील लस पूर्वीइतकी प्रभावी राहिली नसल्याने आता सर्पविष संशोधनाला अधिक चालना देण्याची गरज आहे. त्यातून, हाफकिन संस्थेला केंद्र सरकारने राष्ट्रीय विष केंद्र स्थापनेसाठी अनुमती आणि निधी दिला आहे. त्यातून सापाच्या विषापासून विविध औषधे तयार केली जाऊ शकतात. राष्ट्रीय विष संशोधन केंद्रात विष दंशावर अन्य उपचार शोधले जात असल्याची ग्वाही हाफकिन संस्थेच्या संचालिका डॉ. निशिगंधा नाईक यांनी दिली.

आपल्या देशात दरवर्षी सर्पदंशामुळे ५० हजारांहून अधिक लोक प्राण गमावतात. हे ऐकून साप हा प्राणी जीव घेणारा वाटत असला तरी काही दुर्धर आजारांमध्ये प्राणी जीवनदायी ठरत आहे. दीड लाखांहून अधिकांना दरवर्षी कायमचे अपंगत्व येते. यामुळे सर्पाच्या विषाचे महत्व वाढत आहे. हाफकिनमध्ये सर्पाचे विष संकलित केले जाते. त्यातून लस बनवण्यासाठी विष दिले जाते. त्यावर संशोधन होत आहे. आपल्याकडे आणि इतर देशांमध्ये वेगळ्या सर्पाच्या जाती आहेत. पण, इतर आजारांवरील उपचार नक्की होऊ शकतो, असंही डॉ. नाईक यांनी सांगितलं.

या आजारांवर तयार होतात औषधं 

राष्ट्रीय विष संशोधन केंद्रात सर्प दंशावर परिणामकारक आणि कमीत कमी विष लागून उपचार होईल, असे प्रयोग सुरू आहेत. सर्पदंशाने होणाऱ्या त्रासावर त्या सर्पाची लस उपचार म्हणून असते. या, लसींसोबत इतर आजारांवरील औषधे आणि सवय न लागणारी वेदनाशमक निर्मितीचा विचार करण्यात येणार आहे.  – डॉ. निशिगंधा नाईक, संचालिका, हाफकिन संस्था


हेही वाचा – बारामतीच्या घोणस सापाची परळच्या ‘हाफकीन’मध्ये प्रसुती