घरमुंबईवादग्रस्त जाहीरातीमुळे हॉटेल मालकाची पोलिसात तक्रार

वादग्रस्त जाहीरातीमुळे हॉटेल मालकाची पोलिसात तक्रार

Subscribe

उल्हासनगरमध्ये होळी निमित्त हॉटेलमालकाने वादग्रस्त जाहीरात सोशियलमिडीयावर टाकली होती. या जाहिरातीवर आक्षेप घेत छावा संघटनेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याची तक्रार केली आहे.

उल्हासनगर मधील एका हॉटेलमालकाने होळीसाठी सोशल मिडीयावर जाहीर केलेल्या ऑफर मध्ये दारू आणि चुंबन अश्या अश्लील शब्दांचा उल्लेख वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या जाहिरातीवर आक्षेप घेत छावा संघटनेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याची तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर हा होळीनिमित्त होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

काय होतं जाहीरातीत

- Advertisement -

उल्हासनगर पश्चिम येथे रेल्वे स्थानकाजवळ ‘पी ९ ड्रंकयार्ड’ नामक हॉटेल आहे. या हॉटेलच्या वतीने होळी पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या पार्टीची जाहिरात फेसबुक वर टाकण्यात आली. हि जाहिरातीची पोस्ट मोठ्या प्रमाणात नेटकर्त्यांपर्यंत पोहचावी यासाठी विशिष्ट अश्या हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता. यामध्ये ‘गर्ल्स व्हो किस गर्ल्स’ या हॅशटॅगचा वापर करण्यात आला होता. तरुण – आणि तरुणींना आकर्षित करण्यासाठी  म्युझिक, डीजे, बियर, व्होडका, मुलींचे चुंबन, शॉट्स आदी गोष्टींना हॅश टॅग करून उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला.

हि पोस्ट छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निखिल गोळे यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची तक्रार पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

याबाबत छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निखिल गोळे म्हणाले की, होळी हा सण हिंदू संस्कृतीचा पवित्र सण  असून प्रत्येकाने त्याची पवित्रता राखली पाहिजे. पी ९ ड्रंकयार्डची जाहिरात असभ्य व संस्कृतीचा दर्जा खालावणारी आहे, यामुळे अश्या कार्यक्रमाचा आम्ही विरोध करतो.

आम्ही जाहिरातीत कुठेही अश्लील अश्या शब्दांचा उल्लेख केलेला नाही. ह्या जाहिरातीचा प्रसार करण्याची जबाबदारी खाजगी संस्थेला दिली होती. त्यांनी हॅशटॅगचा वापर केला आहे. मात्र त्यामुळे हिंदू संस्कृतीला ठेच पोहचत असल्याची बाब निखिल गोळे यांच्या माध्यमातून मला समजल्यावर मी होळीचा नियोजित कार्यक्रम रद्द केला आहे. मी हि एक हिंदू असून संस्कृतीचे रक्षण करणे हि आमची जबाबदारी आहे.    –  भावेश बठीजा, पी ९ ड्रंकयार्डचे मालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -