घरमुंबईनिवडणूक कामावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर

निवडणूक कामावर ‘वॉच’ ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांतील सहा लोकसभा मतदारसंघात  29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मतदान प्रक्रिया निर्भय, नि:पक्ष व पारदर्शी वातावरणात पार पडण्याचे उद्दिष्ठ्य केंद्रीय निवडणूक आयोगाने ठेवले आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी तसेच ईव्हीएमचे रॅण्डमायझेशन (सॉफ्टवेअर आधारे होणारी प्रक्रिया) केंद्रिय निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थित संगणकीय प्रणालीने पूर्ण करण्यात आले. यामुळे मतदानाच्या दिवशी कोणत्या कर्मचार्‍यास, कुठल्या विधानसभा मतदारासंघात काम करण्यास जावे लागेल, याची निश्चिती आता प्रशासकीय स्तरावर करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील ४७ हजार ८०० कर्मचार्‍यांचा ताफा निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आला आहे, त्यांच्या जबाबदार्‍याही याच सॉफ्टव्हेअरच्या माध्यमातून निश्चित करण्यात आल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी महिला कर्मचारी, अधिकारी, यांच्या निवास, प्रवास व्यवस्था, तसेच योग्य वेळी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून मतदान वेळेत सुरू करण्यासाठीची घ्यावयाची काळजी, या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले व सूचना दिल्या. तसेच उमेदवार तसेच त्याच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ई.व्ही.एम .चे रॅण्डमायझेशन झाले. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये 10 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 2 लोकसभा मतदारसंघामध्ये 30 मुंबई दक्षिण मध्य व 31 मुंबई दक्षिण यांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघामध्ये 2 हजार 601 मतदान केंद्रे आहेत, या प्रत्येक मतदानकेंद्रात प्रत्येकी किमान 5 कर्मचार्‍यांची आवश्यकता असते. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त कर्मचार्‍यांची कुमक तात्काळ उपलब्ध व्हावी. यासाठी आवश्यकतेपेक्षा किमान 10 टक्के अधिक कर्मचारी आरक्षित म्हणून कर्तव्यावर असणे गरजेचे असते. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील 2,601 मतदान केंद्रांसाठी 15 हजार कर्मचार्‍यांचे द्वितीय रॅण्डमायझेशन रविवारी झाले.

- Advertisement -

मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये ४ लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये २६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच सदर ४ लोकसभा मतदारसंघांमध्ये मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम(वायव्य), मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य), उत्तर मध्य यांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये ७ हजार ४७२ मतदान केंद्रासाठी ३२ हजार ८७८ कर्मचा-यांचे द्वितीय स्तरीय ‘रॅण्डमायझेशन’ नुकतेच संपन्न झाले असून यामुळे कोणत्या कर्मचार्‍यास कुठल्या विधानसभा मतदारसंघ स्तरावर कर्तव्य बजावण्यासाठी जावे लागेल याची निश्चिती करण्यात आली आहे.

नॅशनल इन्फॉमेंटिक्स सेंटर यांनी विकसित केलेल्या पोलिंग स्टाफ मॅनेजमेंट सिस्टम या संगणकीय सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही रॅण्डमायझेशनची प्रक्रिया करण्यात येत आहे. अंतिम तृतीय स्तरीय रॅण्डमायझेशन हे प्रत्यक्ष् मतदानाच्या आदल्या दिवशी करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -