घरमुंबईमहापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये सौरऊर्जेचा वापर

महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये सौरऊर्जेचा वापर

Subscribe

परवडणारी किमती नाट्यगृहे मिळण्यासाठी सेनेची मागणी

मुंबईतील सर्व गावाखेड्यांमधील नाट्यगृहांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्यात येत आहे, त्याचधर्तीवर मुंबईतील महापालिकेच्या ताब्यातील सर्व नाट्यगृहांमध्ये सौरउर्जेची यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. अशाप्रकारची यंत्रणा बसवल्यास विजेची बचत होईलच, शिवाय त्यावरील खर्चातही कपात होईल आणि यामुळे निर्मात्यांना कमी दरात नाट्यगृहे उपलब्ध करून देता येतील, असे नगरसेवकांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये सौरऊर्जेची यंत्रणा बसवण्यात यावी. जेणेकरून विजेच्या खर्चात बचत होईल व नाट्यनिर्मात्यांना कमी खर्चात नाट्यनिर्मिती करता येईल आणि रसिक प्रेक्षकांनाही परवडण्याजोग्या दरात नाटके पाहता येतील, अशी मागणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. मुंबई महानगरात विजेची मागणी सातत्याने वाढत असून, विजेचे दरही कमालीचे वाढलेले आहेत. सातत्याने आणि अधिक प्रमाणात विद्युत ऊर्जेचा वापर केल्यामुळे तसेच विजेचे संकट ओढण्यापूर्वी ऊर्जेच्या अन्य पर्यायांचा विचार करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यापैकी सौरऊर्जा हा एक स्वच्छ अपारंपरिक ऊर्जेचा स्त्रोत असून, देशाच्या आर्थिक वाढीसाठी व कल्याणाकरता महत्त्वाच्या असलेल्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अपारंपरिक ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत म्हणून अनेक विकसित देशांमध्ये आता सौरऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक खेड्यांमध्ये विजेच्या कमतरतेमुळे वीज भारनियमन करण्यात येत असल्याने अनेक नाट्यगृहांमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा वापर करण्यात येतो. परिणामी विजेची बचत झाल्यामुळे नाट्यनिर्मार्त्यांना माफक दरात नाट्यगृहे उपलब्ध होऊन रसिक प्रेक्षकांनाही कमी दरात दर्जेदार नाटके उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -