नाट्यगृहांमध्ये बसवणार सौरऊर्जा

वीजेच्या बचतीसह प्रेक्षकांनाही मोजावे लागतील कमी दर

Mumbai
Solar

मुंबई महापालिकेच्यावतीने सौरऊर्जा प्रकल्प राबवून वीज बचतीचा अवलंब केला जात असताना आता नाट्यगृहांमध्येही सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. सौरऊर्जा प्रकल्पाचे आयुष्यमान सुमारे २५ वर्षे असल्यामुळे विविध नाट्यगृहांच्या इमारतींची पाहणी भेट करून सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठीची व्यवहार्यता पडताळून पाहण्याचा निर्णय महापालिकेने केला आहे.

राज्यात वीजेचे संकट असून मोठ्याप्रमाणात वीजेची मागणीही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात वीज बचत ही आवश्यक असून त्यादृष्टीकोनातून रेल्वेसह अनेक सरकारी उपक्रमांनी सौरऊर्जा प्रकल्प राबवले जात आहेत. त्यानंतर मुंबई महापालिकेनेही त्यादृष्टीकोनातून पाउुल उचलत भांडुप संकुलातही अशाप्रकारचा प्रकल्प उभारला. यामुळे महापालिकेची वीजेची बचत होवून पर्यायाने यासाठी होणारा वीजेवरील खर्च कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या अखत्यारित येणार्‍या विविध नाट्यगृहांच्या इमारतींची पाहणी भेट करून सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठीची व्यवहार्यता पडताळून पाहण्यात येईल. तसेच त्या नाट्यगृहाच्या इमारतींच्या स्ट्क्चरल ऑडीट संबंधित विभागामार्फत खात्री करण्यात येईल. त्यानंतर सौरउर्जा प्रकल्प उभारणीसाठी लागणारी भांडवली तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात येईल, अशी माहिती महापालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाच्या प्रमुख अभियंता यांनी दिली आहे.

विजेची वाढती मागणी आणि विजेचे वाढत दर लक्षात घेता भविष्यात विजेचा वापर अधिक होवून विजेचे संकट ओढवण्यापूर्वीच महापालिकेने बचतीचा मार्ग स्वीकारायला हवा. त्यासाठी महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात यावेत अशी मागणी काही महिन्यांपूवी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. आजही महाराष्ट्ातील अनेक खेड्यांमध्ये विजेच्या कमतरतेमुळे वीज भारनियमन करण्यात येत असल्याने अनेक नाट्यगृहांमध्ये सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे वीजेची बचत झाल्यामुळे नाट्यनिर्मार्त्यांना माफक दरात नाट्यगृहांमध्ये माफक दरात नाट्यगृहे उपलब्ध होवून रसिक प्रेक्षकांना कमी दरात दर्जेदार नाटके पाहायला मिळतात,असे त्यांनी आपल्या मागणीत म्हटले होते.