घरमुंबईविदर्भात पाण्याअभावी सोलार पंपांची दैना

विदर्भात पाण्याअभावी सोलार पंपांची दैना

Subscribe

सेंटर फॉक सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायरमेंटचा अभ्यास

किसान ऊर्जा सुरक्षा आणि उथ्थान महाभियान (कुसुम) या केंद्राच्या महत्त्वाकांक्षी अशा योजनांच्या अंमलबजावणीनंतरही महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेतीला पाणी पुरवठ्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस भूजल पातळीतील घट हे मोठे आव्हान शेतकर्‍यांसमोर आहे. बुलढाण्यातील शेतकर्‍यांनी आपल्या शेतात सोलार पंपच्या योजनेअंतर्गत पिकाला पाणी दिले. पण पाण्याच्या खालावलेल्या पातळीमुळे अवघे कापसाचे एक पिक तसेच एखादे डाळीचे पिक घेण्यातच या शेतकर्‍यांना यश आले आहे. सेंटर फॉर सायन्स एनव्हायरमेंटने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.

सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एनव्हायरमेंट (सीएससी) ने बुलढाणा जिल्ह्यातील २२ गावांतील ७२ शेतकर्‍यांना सर्वेक्षणासाठी समाविष्ट केले होते. पाण्याची चणचण असणार्‍या विदर्भातील दुष्काळी भागांचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता. पाण्याची चणचण असणार्‍या भागात सोलार पंपचा वापर कशा पद्धतीने होतो याचा अभ्यास सर्वेक्षणात करण्यात आला. या शेतकर्‍यांपैकी ९० टक्केे शेतकरी हे सोलार पंपचा वापर करतात.

- Advertisement -

तर याआधी ५६ टक्के शेतकरी हे डिझेल पंपचा वापर करत होते, तर ३५ टक्के शेतकरी हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेती करत होते. तर ९ टक्केे शेतकरी हे विजेवर आधारीत पंपाचा वापर करत होते. शेतीत भूजलपातळीचा उपसा वाढल्याने शेतीची उत्पादकता वाढली आहे, पण भूजलपातळीत घट होण्यावरही याचा परिणाम झाला आहे, असे मत महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य एच.एम देसर्डा यांनी सीएसईच्या बैठकीत मांडले आहे.

गेल्या १५ ते २० वर्षात पाण्याची पातळी ही १०० ते ३०० फुटांवरून ५० ते १०० फुटांपर्यंत खालावली आहे. याचा परिणाम हा शेतकर्‍यांना कापसाचे पीक घेण्यावर तसेच डाळींच्या उत्पादनावर दिसून आलेला आहे. नांदुरा येथील हौदा गावात अनेक शेतकर्‍यांनी शेतीसाठी सोलार पंपचा वापर केला आहे. पण अनेक शेतकर्‍यांनी पाण्याची पातळी खालावल्याने शेतीला याचा फटका बसल्याचा अनुभव सर्वेक्षणादरम्यान व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -