आमिर खानच्या घरामध्ये कोरोनाबाधित; आईसह स्वतःची करणार चाचणी

Mumbai
aamir khan
आमिर खान

बॉलीवूड अभिनेता आमिर खान याच्या घरामध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. त्याच्या संपर्कातील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली असून याबाबतची माहिती स्वतः आमिरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काही जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळताच सगळे क्वारंटाईन झाले असून आमिर त्याच्या आईसह स्वतःचीही कोरोना चाचणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मुंबईत मागील २४ तासांत १ हजार २४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा ७६ हजार २९४वर पोहोचला असून मृतांचा आकडा ४ हजार ४६१वर पोहोचला आहे. तर राज्यात ५ हजार २५७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १८१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ६९ हजार ८८३ वर पोहोचला असून मृतांचा आकडा ७ हजार ६१० झाला आहे. तसेच आज २ हजार ३८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत राज्यात ८८ हजार ९६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ५२.३७ टक्के इतका आहे.

हेही वाचा –

कोरोना नेमका कुठून आला, याचा शोध WHO घेणार!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here