घरमुंबईमुलगा, सूनेमुळे होतो ज्येष्ठांना सर्वाधिक त्रास

मुलगा, सूनेमुळे होतो ज्येष्ठांना सर्वाधिक त्रास

Subscribe

'जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती' दिनानिमित्त हेल्पेज इंडियाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

घरात ज्येष्ठ नागरिक असतील तर घराला घरपण येतं असं म्हणतात. पण, ज्यांच्यासाठी ज्येष्ठ आयुष्यभर झटत असतात त्यात मुलांमुळे ज्येष्ठांना सर्वाधिक त्रास होत असल्याचं हेल्पेज इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

‘जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचारविरोधी जनजागृती’ दिनानिमित्त हेल्पेज इंडियाकडून एक सर्वेक्षण केले गेले. या सर्वेक्षणात ज्येष्ठांबाबत त्यांच्या नातेवाईकांना काय वाटतं यावर प्रश्न विचारण्यात आले. या सर्वेक्षणात २० शहरांतील ३५ ते ५० च्या वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही पिढी वृद्ध आईवडील आणि आपल्या मुलांची देखभाल करते.

- Advertisement -

३५ टक्के केअर गिव्हर्स ज्येष्ठांच्या काळजीसाठी निरुत्साही

यातून समोर स्पष्ट झालं की, त्रास देणाऱ्यांपैकी प्रामुख्याने मुलगा आणि सून हे आहेत. तर, जे लोक ज्येष्ठांचा सांभाळ करतात अशा ३५ टक्के केअर गिव्हर्सना ज्येष्ठांची काळजी घेण्यास अजिबातच उत्साह वाटत नाही तर, २९ टक्के लोकांना ज्येष्ठांचा सांभाळ म्हणजे करणे ओझे वाटते. तसंच, २९ टक्के व्यक्तींना ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवून भेटायला जायला आवडतं. २५.७ टक्के देखभाल करणारे सांगतात की, आपल्या कामाचा किंवा इतर राग ते ज्येष्ठांवर काढतात. तसंच, सर्वात जास्त ६८ टक्के सुना ज्येष्ठांची जबाबदारी आपल्या नोकरांवर सोपवतात. ७० टक्के ज्येष्ठांना देखभाल करणाऱ्यांकडून भावनिक आधाराची गरज असते, असेही अहवालात नमूद केल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांचा औषधांवर मोठा खर्च होतो. त्यांना मोफत औषधे सरकारने उपलब्ध करून द्यायला हवीत. तसेच जी मुले ज्येष्ठांचा चांगला सांभाळ करतात त्यांना करामध्ये सूट द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेल्पेज इंडियाकडून गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे. २० शहरांतील ३५ ते ५०च्या वयोगटातील व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात आल्या. ही पिढी वृद्ध आईवडील आणि आपल्या मुलांची देखभाल करते. यावर्षी ‘वृद्धांची काळजी घेणे – आव्हाने आणि त्यांची काळजी घेणे’ या विषयावरील एक अभ्यास करण्यात आला. पण, यात सर्वात जास्त व्यक्तींना ज्येष्ठांना सांभाळणे म्हणजे ओझे असल्याचे वाटत होते. हेल्पेज इंडियाकडून ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ‘सेव्ह अवर सिनिअर’ या अ‍ॅपचे अनावरणही करण्यात आले. याचा फायदा नक्कीच होऊ शकतो.
प्रकाश बोरगावकर, संचालक, हेल्पेज इंडिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -