घरमुंबईबंद पुलांचे रिऑडीट होणार; आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन

बंद पुलांचे रिऑडीट होणार; आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन

Subscribe

मुंबईतील बंद पुलांचे रिऑडीट करून त्याची माहिती जनतेला देण्यात येईल असे आश्वासन आयुक्तांनी संजय निरुपम आणि शिष्टमंडळाला दिले.

मुंबईत बंद करण्यात आलेल्या २९ पूलांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल सामाजिक संघटनांसोबत काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी या सर्व २९ पूलांचे ऑडिट करण्यासाठी मुंबई महापालिका नामांकित पूल तज्ज्ञ तसेच प्रसिद्ध व तज्ज्ञ अभियंता असलेली पूल सल्लागार समिती नेमण्यात येईल. अशाप्रकारे सर्व पूलांचे रिऑडिट केले जाईल, असे आश्वासन दिले.

तज्ज्ञ शिष्टमंडळासह निरुपमांनी घेतली आयुक्तांची भेट

पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईतील प्रमुख २९ पूल पुनर्बांधणीसाठी व डागडूजीसाठी बंद करण्यात आले आहेत. हे पूल बंद केल्यामुळे पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहेत. याच मुद्द्यांसाठी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी काही तज्ज्ञमंडळी, अभियंता, महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासोबत महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये पूल तज्ज्ञ शिरीष पटेल, डॉ. शेणॉय, डॉ. नुरी, सामाजिक कार्यकर्त्या सुचेता दलाल आदी तज्ज्ञ मंडळींचा समावेश होता.

- Advertisement -

रिऑडीटची माहिती जनतेला देणार

आयुक्तांनी यावेळी बंद सर्व पूलांचे रिऑडीट करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करत त्याची संपूर्ण माहिती जनतेसमोर सार्वजनिकरित्या मांडली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी ज्या पुलांचे काम, पुनर्बांधणी किंवा डागडूजी करणार आहोत, त्याची संपूर्ण माहिती देण्यात यावी अशी सूचना यावेळी संजय निरुपम यांनी केली. या सूचनेत पूल कधी बंद केला जाईल. पुन्हा कधी खुले केले जाईल तसेच त्यासाठी किती खर्च केला जात आहे, याच्या माहितीचे फलक प्रत्येक पूलाच्या बाहेर लावण्यात येईल. जेणेकरून त्यांची संपूर्ण माहिती जनतेसमोर येईल, अशी सूचना केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -