घरमुंबईकार्यकर्ते फोडता येत नाहीत म्हणून अशी विधानं - रईस शेख

कार्यकर्ते फोडता येत नाहीत म्हणून अशी विधानं – रईस शेख

Subscribe

'रईस शेख यांनी लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला मदत केली होती', या भाजपचे नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांच्या वक्तव्यावर अखेर रईस शेख यांनी खुलासा केला आहे.

‘मी समाजवादी पक्षाचा निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. या पक्षाशिवाय अन्य पक्षाचा विचार करणे सोडा, त्यांना मदत करण्याचा देखील विचार करू शकत नाही’, असे समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख यांनी ‘माय महानगर’शी बोलताना स्पष्ट केले. ‘मुंबईत समाजवादी पक्ष मजबूत होत आपले अस्तित्व टिकवून असताना काही पक्षांकडून उलट सुलट विधाने केली जात’ असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई महापालिका सभागृहात अभिनंदन प्रस्तावावर बोलताना भाजपचे खासदार मनोज कोटक यांनी रईस शेख यांनी आपल्याला मदत केल्याचे विधान केले होते.

‘सत्ताधारी पक्षही कार्यकर्त्यांसमोर हतबल’

यावर बोलताना समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख म्हणाले, ‘हे विधान कोटक यांनी विनोद म्हणून केले होते. परंतु त्यांच्या विधानाचा आधार घेत उलटसुलट वृत्त प्रसारीत झालेली आहेत. आपण पक्षाचा प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ता आहोत. समाजवादी पक्षाचे मुबई अध्यक्ष, आमदार अबू असीम आझमी यांच्या नेतृवाखाली मुंबईत समाजवादी पक्ष अधिक मजबूत होत आहे. तो अजून मजबूत करण्यासाठी मी आणि पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेहनत घेत आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांची ही चिकाटी पाहून सत्ताधारी पक्षही हतबल ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

वाचा काय म्हणाले होते मनोज कोटक – रईस शेख यांनी निवडणुकीत मदत केली!

‘सपाचे कार्यकर्ते निष्ठावान’

‘समाजवादी पक्षाची मुंबईतील ताकद आजही टिकून आहे आणि राहणार आहे. मागील विधान सभा निवडणूक पहा किंवा त्यानंतरची महापालिका सार्वत्रिक निवडणूक पहा. समाजवादी पक्षाचे मुंबईतील स्थान, अस्तित्व टिकून आहे. या उलट काही प्रादेशिक पक्ष यात वाहून गेले. समाजवादी पक्षाची ही मजबूत पकड या लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली आहे. समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते हे कट्टर आणि निष्ठावान असून, त्यामुळेच ज्यांना आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांना फोडता येत नाही, ती मंडळी काही विधाने करून पक्षात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे माझ्या संदर्भात कोणतेही वृत्त आल्यास त्यावर कुठल्याही कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या वृत्ताकडे दुर्लक्ष करून पक्षाचे काम करत राहावे. कुणालाही शंका असल्यास त्यांनी मला थेट संपर्क साधावा’, असे आवाहन देखील रईस शेख यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -