घरमुंबईजे.जे. हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग

जे.जे. हॉस्पिटलमध्ये कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग

Subscribe

कॅन्सरग्रस्त मुलांना त्वरीत उपचार मिळावे यासाठी जे.जे. हॉस्पीलमध्ये विशेष विभाग सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईतील सरकारी हॉस्पिटल्सपैकी सर.जे.जे या प्रमुख हॉस्पिटल्समध्ये कॅन्सरग्रस्त लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात येणार आहे. लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरचं योग्य निदान आणि वेळेवर उपचारांसाठी हा विभाग सुरू करण्यात येणार आहे. कॅन्सरसाठी काम करणाऱ्या ‘कॅनकिड्स’ या संस्थेची या विभागासाठी मदत घेण्यात येणार आहे.

लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरचं अनेकदा योग्य वेळेस निदान होत नाही. शिवाय, कॅन्सर रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळेत उपचार होत नाहीत म्हणून मृत्यूची संख्याही वाढती आहे. न परवडणाऱ्या उपचारांमुळे पालकही हतबल होतात. त्यामुळे, जे. जे. हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येत आहे. या विभागाद्वारे कॅन्सरग्रस्त लहान मुलांवर उपचार करणं सोपं होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डेंग्यूने मुंब्र्यात दोघांचा बळी; युवक काँग्रेसचे थाळीनाद आंदोलन

‘कॅनकिड्स’ आणि जे. जे. हॉस्पिटलमध्ये सामंजस्य करार

‘कॅनकिड्स’ नॅशनल सोसायटी ऑफ चेंज चाइल्डहूड कॅन्सर संस्थेशी जे. जे. हॉस्पिटलने सामंजस्य करार केला आहे. त्या माध्यमातून लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. याशिवाय कर्करोगाविषयी विविध उपक्रमही राबवण्यात येणार आहेत.

लहान मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लाइमफोमा) सर्वात जास्त प्रमाणात आढळतं. या व्यतिरिक्त मेंदूचा, मूत्रपिंडाचा, यकृताचा, हाडांचा असा इतर अवयवांचाही कर्करोग होऊ शकतो.
डॉ. प्रकाश वाकोडे, वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक

बऱ्याचदा लहान रुग्णांमध्ये कर्करोगाचं निदान उशिरा होतं. उपचारांना होणारा विलंब टाळण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये उपचार उपलब्ध झाले पाहिजे. त्या दृष्टीकोनातून जे. जे. हॉस्पिटल प्रशासनासह येत्या काळात काम करणार आहोत. शिवाय, या क्षेत्रातील संशोधनाला बळकटी मिळण्यासाठीही विविध पातळ्यांवर प्रयत्न करणार आहोत.
मुकूंद मारवा, ‘कॅनकिड्स’चे सहसंचालक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -