घरदेश-विदेशमराठमोळ्या तरुणाने साकारलं प्रजासत्ताक दिनी खास गुगल डुडल

मराठमोळ्या तरुणाने साकारलं प्रजासत्ताक दिनी खास गुगल डुडल

Subscribe

गुगलच्या होमपेजवर दिसणारे डुडल हे मुंबईच्या मराठमोळ्या तरुणाने तयार केले आहे. ओंकार फोंडकर असे तरुणाचे नाव आहे.

आज देशााचा ७२वा प्रजासत्ताक दिवस. देशातील प्रत्येक महत्वाच्या दिवशी न विसरता शुभेच्छा संदेश किंवा श्रद्धाजली वाहणारे एकमेव माध्यम म्हणजे गुगल डुडल. इंटरनेटच्या महालाजातील प्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने हे नेहमीत आपल्या गुगल डुडलच्या माध्यमातून खास डुडल तयार करत असते. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलने एक खास डुडल साकारले आहे. ज्यात देशाच्या विविधतेची एकता दिसून येत आहे. यावेळीचे गुगल डुडल मात्र काही खास आहे. कारण गुगलच्या होमपेजवर दिसणारे डुडल हे मुंबईच्या मराठमोळ्या तरुणाने तयार केले आहे. ओंकार फोंडकर असे तरुणाचे नाव आहे. ओंकारने तयार केलेल्या डुडलची दखल घेऊन गुगलनेही त्याचे कौतुक केले आहे.

ओंकारचे डुडल गुगलच्या होमपेजवर दिसल्यानंतर ओंकारनेही त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. भारताच्या विविधतेचे दर्शन मला गुगल डुडलच्या माध्यमातून घडविण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद होत आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. भारताच्या विविधतेला एका कॅनव्हासवर रेखाटणे ही सोपी गोष्ट नव्हती यात अनेक गोष्टी आहेत, असे मत ओंकारने व्यक्त केले.

- Advertisement -

ओंकारने तयार केलेल्या गुगल डुडलमध्ये भारतीच्या विविध संस्कृती,परंपरा दाखवण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे देशातील नृत्य प्रकार त्यातील असलेली विविध परंपरा, विविध प्रकार यांचे उत्तम रेखाटन केले आहे. त्याचबरोबर डुडलच्या माध्यमातून ओंकारने डॉक्टर, विद्यार्थी, कुटुंब, सिनेमा, क्रिकेटचे दर्शन घडवले आहे. ओंकारच्या या डुडलमुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.



हेही वाचा – सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभूणे यांना पद्मश्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -