घरमुंबईसोशल वर्कच्या विद्यार्थिनींसाठी विशेष ग्रंथालय

सोशल वर्कच्या विद्यार्थिनींसाठी विशेष ग्रंथालय

Subscribe

एसएनडीटीमध्ये सावित्रीबाई फुले पुस्तकपेढी सुरू

विद्यार्थिनींमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी. अभ्यासाव्यतिरिक्त कर्तृत्त्वान व्यक्तींचे जीवनचरित्र वाचून समाजकार्याची आवड निर्माण व्हावी, यासाठी एसएनडीटी विद्यापीठातील सोशल वर्क विभागातर्फे सावित्रीबाई फुले पुस्तकपेढी सुरू करण्यात येत आहे. या पुस्तकपेढीमध्ये देशविदेशातील थोर व्यक्तींचे आत्मचरित्र, त्यांनी लिहिलेली पुस्तके, संशोधने वाचण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थिंनीना विविध प्रकारची पुस्तके वाचता यावीत यासाठी विभागाकडून माजी विद्यार्थिंनी व नागरिकांना अशी पुस्तके भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशाातील पहिले महिला विद्यापीठ असलेल्या एसएनडीटी विद्यापीठामध्ये विद्यार्थिंनीच्या शिक्षणासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. विद्यापीठातील सोशल वर्क विभागातील विद्यार्थिंनीना शिक्षण घेताना जगातील थोर सामाजिक कार्यकर्त्यांना काम करताना आलेले अनुभव, त्यांच्या समोर आलेली संकटे, त्यावर त्यांनी केलेली मात याची माहिती त्यांना व्हावी, तसेच त्यांच्या कार्यातून त्यांना सामाजिक कार्याचे विविध पैलू समजावेत यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त सामाजिक व्यक्तींची चरित्र मांडणारी पुस्तके, त्यांनी लिहिलेली आत्मचरित्र, त्यांच्या कार्यावर लिहण्यात आलेली पुस्तके विद्यार्थिनींना उपलब्ध करून देण्याचा निर्णय सोशल वर्क विभागाने घेतला आहे.

- Advertisement -

एसएनडीटी विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमध्ये भली मोठे ग्रंथालय आहे. त्यात अभ्यासाची पुस्तके मोठ्या प्रमाणात असून, विद्यार्थिनी त्यांचा पुरेपुर वापरही करतात. परंतु आर्थिक मान्यता नसलेल्या सोशल वर्क विभागातील विद्यार्थिनींना अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पुस्तके वाचायला मिळावीत यासाठी ही पुस्तक पेढी सुरू करण्याचा निर्णय सोशल वर्क विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. या पुस्तकपेढीची संकल्पना विभागातील शिक्षकांकडून मांडण्यात आली. विद्यार्थिंनीना अभ्यासाव्यतिरिक्त अन्य पुस्तके वाचायला मिळणार असल्याने आम्ही ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला. ही पुस्तकपेढी विद्यार्थिंनीसाठी असल्याने त्याचे नाव सावित्रीबाई फुले पुस्तकपेढी ठेवले असल्याची माहिती सोशल वर्क विभागाच्या प्रमुख डॉ. आशा पाटील यांनी दिली.

विद्यार्थिनींना विविध प्रकारची पुस्तके वाचता यावीत यासाठी विभागाकडून विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिंनी व नागरिकांना किमान एक पुस्तक देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विभागाच्या आवाहनाला माजी विद्यार्थिंनी व नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी पुस्तके देण्यासाठी संपर्क साधला आहे. किमान एक पुस्तकाची मागणी आम्ही केली असताना काही नागरिकांनी तीन-चारपेक्षा अधिक पुस्तके देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सोशल वर्क विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अमेय महाजन यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -