आजपासून ८० नव्या पॅसेंजर ट्रेनची तिकीट बुकिंग सुरू

जाणून घ्या कसे करता येईल तिकीट बुकिंग?

train booking

भारतीय रेल्वेने चालविलेल्या ८० नव्या पॅसेंजर ट्रेनसाठी आजपासून प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार आहे. रेल्वेच्या माहितीनुसार, या ट्रेन आधीपासून सुरू असलेल्या २३० स्पेशल ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. आज सकाळी १० वाजल्यापासून या ट्रेनसाठी रिझर्वेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. या नव्या पॅसेंजर ट्रेनसह एकूण ट्रेनीची संख्या ३१० पर्यंत वाढली आहे.

भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी जाहीर केले की, १२ सप्टेंबरपासून ८० नव्या स्पेशन ट्रेन धावतील. ते म्हणाले की, ‘१२ सप्टेंबरपासून ८० नव्या स्पेशन ट्रेन रुळावर धावतील. यासाठी तिकीटांची बुकिंग सुविधा १० सप्टेंबरपासून सुरू होईल. आधीपासून सुरू असलेल्या २३० स्पेशल ट्रेनपेक्षा या ट्रेन वेगळ्या असतील. या ट्रेन भारताच्या सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गावार चालवल्या जातील.’

रेल्वेच्या माहितीनुसार, ‘या ३१० ट्रेनमध्ये तिकीट नसणाऱ्या प्रवाशांना स्टेशनच्या आत प्रवेश मिळणार नाही. म्हणजेच, जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असणे आवश्यक आहे. रेल्वेने या स्पेशल ट्रेनमधील जनरल डब्बे हटवले आहे आणि यामध्ये रिझर्व्ह सीटची व्यवस्था करण्यात आली आहे.’

आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवासासाठी तिकीट बुक करू शकता. याशिवाय तिकीट बुकिंगसाठी रेल्वेने स्थानकांवर रिझर्वेशन काउंटरची सुविधा दिली आहे. तसेच तुम्ही आयआरसीटीच्या Appद्वारे ट्रेनची तिकीटे देखील बुक करू शकता.

या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तासाभरापूर्वी स्टेशनवर पोहोचावे लागेल. त्यानंतर टेंपरेचर तपासले जाईल. मग यानंतर स्टेशनमध्ये प्रवेश मिळेल. प्रवाशांना वेटिंग तिकिटांवर प्रवास करण्याची परवानगी नाही आहे. अशा परिस्थितीत अचानक प्रवास करण्याचा प्लॅन करणाऱ्या प्रवाशांना थोडा त्रास होईल. तरी देखील या वेळेस प्रवासी रिकामी जागा असल्यास रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरून ट्रेनची तिकीट घेऊ शकतात.

पाहा या नव्या स्पेशन पॅसेंजरर ट्रेनची यादी