घरमुंबईअमित शहांसाठी मातोश्रीवर 'आमरसा'ची मेजवानी

अमित शहांसाठी मातोश्रीवर ‘आमरसा’ची मेजवानी

Subscribe
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. ‘संपर्क फॉर समर्थन’ हे अभियान भाजपने सध्या सुरु केले आहे. त्यांतर्गत शहा आज संध्याकाळी साडे सात वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील मातोश्री बंगल्यावर भेटणार आहेत. या भेटीसाठी मातोश्रीवर सध्या तयारी सुरू आहे. अमित शहा गुजरातचे असल्यामुळे त्यांच्यासाठी ढोकळा, गाठिया असे गुजराती पदार्थ असतील अशी चर्चा माध्यमात सकाळपासून रंगली होती. मातोश्रीवर मात्र काही वेगळाच बेत चालू आहे. अमित शहांचा पाहुणचारसाठी खास आमरसाचा बेत आखण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना आवडणारे ब्रोकोली सूपदेखील तयार करण्यात आले आहे. त्यासोबत इतर काही प्रकारचे सूप शहा यांच्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत शहा यांनी आज दुपारी १ च्या दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित – नेने आणि त्यानंतर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली. या भेटीनंतर भाजपाने माधुरीला राज्यसभेची ऑफर दिली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. भाजपाने ही माहिती चुकिची असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान अमित शहा सायंकाळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सुद्धा भेट घेणार होते.  पंरतु मंगेशकर यांची तब्येत बरी नसल्याने त्यांची भेट रद्द करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -