घरमुंबईHSC, SSC Exams : १०वी, १२च्या परीक्षांच्या तारखा जाहीर!

HSC, SSC Exams : १०वी, १२च्या परीक्षांच्या तारखा जाहीर!

Subscribe

चालू शैक्षणिक वर्षासाठी १०वी आणि १२वीच्या परीक्षांच्या तारखा शिक्षण विभागाने जाहीर केल्या आहेत. त्यानुसार पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात १८ तारखेला १२वीच्या परीक्षा सुरू होणार असून त्या १८ मार्च २०२०पर्यंत सुरू राहतील. तर, १०वीच्या परीक्षा ३ मार्च २०२०पासून सुरू होऊन २३ मार्च २०२०पर्यंच सुरू राहतील. राज्य शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेलं वेळापत्रक हे संभाव्य वेळापत्रक असून परीक्षेपूर्वी शाळा आणि महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात पाठवण्यात येणारं वेळापत्रक हे अंतिम असेल, असं देखील विभागाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दरवर्षी १०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा कधी होणार याच्या तारखांची प्रतिक्षा राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांना देखील असते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचं देखील नियोजन केलं जातं. शाळा आणि महाविद्यालयांना त्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याचं नियोजन करता येतं. त्यामुळे विभागाकडून आधीच संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं जातं. या तारखा जाहीर करतानाच, प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी-तोंडी परीक्षा किंवा इतर विषयांचं वेळापत्रक शाळा आणि महाविद्यालयांना स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असं देखील या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या तारखांवर कुणाला आक्षेप असल्यास, येत्या १५ दिवसांमध्ये त्यासंदर्भातल्या तक्रारी मंडळाकडे पाठवण्यास देखील पत्रकात सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअॅप वेळापत्रकावर विश्वास ठेऊ नका

दरम्यान, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये परीक्षांची अनेक वेळापत्रकं व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडियावरून व्हायरल होत असल्याचं दिसून येतं. मात्र, या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता मंडळाकडून छापील स्वरूपात शाळा आणि महाविद्यालयांना पाठवण्यात येणाऱ्या वेळापत्रकानुसार पेपरच्या तारखा पडताळून मगच विद्यार्थ्यांनी नियोजन करावं, असं या पत्रकात आवाहन करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -