घरमुंबईभिवंडीतील एसएससी पेपरफुटी प्रकरणी कारवाई होणार

भिवंडीतील एसएससी पेपरफुटी प्रकरणी कारवाई होणार

Subscribe

एसएससी परीक्षा दरम्यान भिवंडी शहरात तब्बल पाच विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरु होण्याच्या सुमारे दोन तास आधी फोडून त्या व्हाट्सअॅपच्या माध्यमातून इतरत्र पसरवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी आता कारवाई होणार आहे.

मार्च २०१९ मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, मुंबई यांच्याकडून घेण्यात आलेल्या एसएससी परीक्षा दरम्यान भिवंडी शहरात तब्बल पाच विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरु होण्याच्या सुमारे दोन तास आधी फोडून त्या व्हाट्सअॅपच्या माध्यमातून इतरत्र पसरवण्याप्रकरणी भिवंडीत शहर पोलीस तसेच नारपोली पोलीस या दोन पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले होते. या प्रकरणी थेट सहभाग असणाऱ्या शिक्षकांच्या शाळांवर परीक्षा मंडळाकडून कारवाई होण्याचे संकेत दिले जात आहेत.

त्या दोन शाळांवर कारवाई

या परीक्षादरम्यान विज्ञान १ व २, बीजगणित, भूमिती, समाजशास्त्र व राज्यशास्त्र, भूगोल या विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी भिवंडी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून त्यामध्ये काकतीय हायस्कुलचे उपमुख्याध्यापक अंबर अन्सारी आणि रफीउद्दीन फक्की बॉईज हायस्कुलचे शिक्षक साजिद खरबे या परीक्षादरम्यान केअर प्रमुख म्हणून जबाबदारी संभाळणाऱ्या शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळानेसुध्दा हे दोन आरोपी कार्यरत असलेल्या शाळांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमून या पेपरफुटी प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली असून संबंधित शाळांकडून खुलासा मागविला जात असून त्यांनतर या शाळांवर मुंबई परीक्षा मंडळाच्या कार्यकक्षेत येणारी कारवाई केली जाणार असल्याची माहिती परीक्षा मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांनी दिली आहे .

- Advertisement -

चौकशीनंतर कारवाईला विलंब का

दरम्यान, या पेपरफुटीला वाचा फोडणारे संवाद फाऊंडेशनचे गोविंद शर्मा यांनी या संपूर्ण प्रक्रियेत परीक्षा मंडळाने पेपरफुटी प्रकरणाची माहिती देऊन सुध्दा जे गांभीर्य बाळगून गुन्हे दाखल करायला हवे होते. ती प्रक्रिया विलंबाने केल्यानेच दरम्यानच्या काळात ही पेपरफुटी बिनदिक्कतपणे सुरु होती. त्यानंतर घाईघाईत परीक्षा मंडळाने तक्रार केल्या नंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यानंतर या शाळांची चौकशी करून कारवाई करण्यास एवढा वेळ लागणे हे सुध्दा न कळण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा –

कौमार्य चाचणीच्या दहशतीने तरुणी करत आहेत कौमार्य शस्त्रक्रिया!

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी मनसेचा मोर्चा; १७ मे रोजी पालिकेवर धडकणार

तोडगा निघाला! मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाची सरकारला परवानगी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -