Sushant Death Case : सुशांतच्या मृत्यूनंतर बहिणीसोबत झालेला संवाद संदीपने केला शेअर

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सीबीआय चहुबाजूंनी चौकशी करत आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर संदीप सिंह हे नाव सतत चर्चेत राहिले आहे. १४ जून रोजी मुंबईतील राहत्या घरी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुशांतने आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले होते. मात्र सुशांतच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या, असे असले तरी सुशांतचा मृत्यून नेमका कसा झाला याचं कोडं आजही उलगडू शकलं नाही. सुशांताचा मृत्यू झाला त्यावेळी त्याची बहिण मीतू यांच्यासोबत संदीप सिंह दिसला होता.

संदीपने सिंहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही पोस्ट शेअर करत त्याची बाजू मांडली आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी संदीपला ओळखत नसल्याचे म्हटले होते. पण संदीपने सुशांतच्या बहिणीसोबतचे काही चॅट शेअर केले आहेत. तसेच १४ जून या दिवशी तो सुशांतच्या बहिणीसोबत का होता. याचे उत्तरही त्याने दिले आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच तो सुशांतच्या घरी पोहोचला. घरी पोहचल्यानंतर मीतू ही सुशांतची बहिण एकटीच तिथे होती. तिची मदत करण्यासाठी तो सोबत होता, असे संदीपने म्हटले आहे.

१४ जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे पार्थिव शरीर रुग्णवाहिकेतून कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. याच रुग्णवाहिकेच्या चालकाला संदीपने दोन दिवसांनंतर फोन केल्याचे उघड झाले होते. त्याने हा फोन नेमका का केला याचे उत्तर सुशांतच्या बहिणीसोबतचे चॅट शेअर करून दिले. रुग्णवाहिकेचे भाडे दिले गेले आहे की, नाही हे पाहण्यासाठी सुशांतच्या बहिणीने संदीपला सांगितले होते, असे या चॅमधून दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी कूपर हॉस्पिटलमध्ये संदीप कोणाला तरी अंगठा दाखवून काही तरी इशारा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावरही त्याने हे स्पष्टीकरण दिले आहे. कूपर हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी संदीप सिंह कोण आहे? असे विचारले होते. त्यावर मोठ्याने न ओरडता मी अंगठा दाखवून पोलिसांना मीच संदीप असल्याचे सांगितले होते, असे त्याने म्हटले.

हेही वाचा –

वीजबिल कमी करा, नाहीतर लोकांच्या रोषाला सामोरे जा – राज ठाकरे