घरमुंबईएसटी, ओला उबरलाही फास्ट टॅग

एसटी, ओला उबरलाही फास्ट टॅग

Subscribe

ईटीसी टॅग होणार कालबाह्य

सध्या मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असणारे ईटीसी टॅगचे तंत्रज्ञान येत्या तीन महिन्यांत कालबाह्य होणार आहे. संपूर्ण राज्यात फास्ट टॅगचा वापर मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवठादारांची मदत मुंबई रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत घेण्यात येणार आहे. राज्यात ओला, उबर आणि एसटी महामंडळ यासारख्या सर्वाजनिक परिवहन सेवा पुरवणार्‍यांनीही फास्ट टॅग वापरावा, हा यामागचा उद्देश आहे. यामुळे टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच कमी कालावधीत जास्त वाहने टोलनाक्यावरून पुढे जातील.

ईटीसी आणि फास्ट टॅग या दोन्ही टॅगसाठी आरएफआयडी हे तंत्रज्ञान सारखेच आहे. पण फास्ट टॅगमध्ये अद्ययावत फिचर्सचा समावेश आहे. पण देशात महामार्गावरील टोलनाक्यांवर फास्ट टॅगचे तंत्रज्ञान वापरात असल्यानेच एमएसआरडीसीने फास्ट टॅग वापरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन महिन्यांमध्ये ईटीसी टॅग वापरकर्त्यांना फास्ट टॅगकडे वळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. सध्या मुंबईत दीड लाख कारचालकांकडून ईटीसी टॅगचा वापर करण्यात येतो. ईटीसी टॅग वापरणार्‍यांची संख्या ही खूपच कमी आहे. ही संख्या आणखी वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. म्हणूनच ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियनसोबत आम्ही बोलणी करत आहोत. तसेच ओला आणि उबर यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवा क्षेत्रातील वाहनांमध्ये फास्ट टॅग वापरण्यात यावा यासाठी या कंपन्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली.

- Advertisement -

फास्ट टॅगिंगची टेक्नॉलॉजी ही वाहनांचा आरएफआयडीचा कोड तात्काळ स्कॅन करण्यासाठी मदतनीस ठरते. टोल नाक्यावर रोख पैसे घेताना एका गाडीसाठी १५ ते २० सेकंद लागतात. एका तासात रोख पैसे देऊन टोल नाक्यावरून निघणारी वाहने ही २१० ते २५० च्या घरात असतात. पण फास्ट टॅग असल्यावर एका तासात या गेटमधून सुमारे २ हजार वाहने जाऊ शकतात. त्यामुळेच फास्ट टॅगिंगच्या वापरासाठी आम्ही भर देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कोटक, एक्सिस, एचडीएफसी यासारख्या २१ राष्ट्रीय बँकांमधून हा फास्ट टॅग देण्यात येणार आहे. साधारणपणे १०० रूपये इतकी प्रत्येक टॅगची किंमत आहे. सहा महिन्यात हे टॅगधारक दुप्पट होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

एसटी बसगाड्यांवरही फास्ट टॅग
एसटी महामंडळाच्या बसगाड्यांवर फास्ट टॅग बसवण्यासाठीची चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे. राज्यातील प्रमुख महामार्गावर धावणार्‍या एसटी बसगाड्यांसाठी हे टॅग बसवण्याकरता राज्य परिवहन महामंडळानेही मागणी केली आहे. त्यामुळे टोल नाक्यांवर एसटीलाही जास्त काळ वाहतूक कोंडीत अडकावे लागणार नाही. तसेच एसटीच्या कारभारातही यामुळे पारदर्शकता येईल. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीकडूनही फास्ट टॅग हे नव्या वाहनांना बसवण्यात येणार आहेत.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -