घरमुंबईमल्हार महोत्सवाची आजपासून धूम

मल्हार महोत्सवाची आजपासून धूम

Subscribe

‘द मल्टिव्हर्स-अनेक्सस ऑफ पॉसिबिलिटी’ म्हणजेचे संभावनेचे मिलन या थीमअंतर्गत आजपासून सेंट झेवियर्सच्या ‘मल्हार’ फेस्टिवलला सुरुवात होत आहे. 17 ऑगस्टपर्यंत चालणार्‍या मल्हारमध्ये मौजमस्तीबरोबरच विद्यार्थ्यांना बौद्धिक मेजवानीचा आनंद घेता येणार आहे. देश-विदेशातील नामांकित व्यक्ती हे विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्याचा मंत्र देणार आहेत.

मल्हार कॉन्क्लेवमध्ये उर्जात्मक, विचार विस्मयकारक मुद्दे आणि वाद-विवाद विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहेत. 15 ऑगस्टला पहिल्याच दिवशी होणार्‍या चर्चासत्रामध्ये भारताचे भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सर विलियम मार्क टली सकाळी 9 ते 10 दरम्यान विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. पाणी संकट या विषयावर लेखक आणि संशोधक डॉ. जयंत बंद्योपाध्याय, लेखक श्रीपाद धर्माधिकारी यांच्यासह विविध मान्यवर हे चर्चासत्रात सहभाग होणार आहेत. एलजीबीटी विषयावर अरुंधती काटजू आपली मते व्यक्त करणार आहेत. त्याचप्रमाणे खेळात महिलांचा सहभाग याविषयी वैदही वैद्य विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -