घरमुंबईस्थायी समितीने सुचवली 186 कोटींची वाढ

स्थायी समितीने सुचवली 186 कोटींची वाढ

Subscribe

केडीएमसी अर्थसंकल्प

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने 186 कोटी रुपयांच्या वाढीव महसुली उत्पन्नात वाढ सुचविली असून, समितीने 2123 कोटी 99 लाख जमा व 2123 कोटी 88 लाख खर्चासह 10 लाख 51 हजार शिलकी अंदाजपत्रकाला सोमवारी मंजुरी दिली. येत्या सर्वसाधारण सभेत हे अंदाजपत्रक अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. महापालिकेचा सन 2019- 20 ची रक्कम 1937 .99 कोटी जमेचा व 1937. 88 कोेटी खर्च असलेला 10. 51 लक्ष शिलकीचा अंदाजपत्रक केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी नुकताच स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांना सादर केला आहे. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीत सखोल चर्चा करण्यात आली. महसुली उत्पन्नात 186 कोटी रूपयांची वाढ सुचवली. त्यामुळे सन 2019 20 च्या 2123 कोटी 99 लाख जमा व 2123 कोटी 88 लाख खर्चासह 10 लाख 51 हजार शिलकी अंदाजपत्रकाला स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील महिन्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने या शेवटचया अखरेपर्यंत हे अंदाजपत्रक मंजूर करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -