घरमुंबईअखेर दिव्यातील नागरी सुविधांच्या कामांना सुरुवात

अखेर दिव्यातील नागरी सुविधांच्या कामांना सुरुवात

Subscribe

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कळवा, खारीगाव, विटावा, मुंब्रा, दिवा, देसाई, शीळ परिसरात अनेक विकास कामे मंजूर करून घेतली आहेत. या मंजूर झालेल्या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे. कळवा प्रभाग समिती अंतर्गत विटावा, खारेगाव या भागातील अभ्यासिका, शाळा, आरोग्य केंद्र, रस्ते, उद्याने, चौकांचे सुशोभिकरण तसेच दिवा व मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत जलवाहिन्या, युटीडब्ल्युटी रस्ते अशा एकूण सुमारे 60 कोटी रूपयांच्या विकास कामांची ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

यामध्ये प्रामुख्याने दिवा प्रभाग समिती अंतर्गत दिवा-आगासन रोड ते दातिवली रेल्वे फाटक हा रस्ता युटीडब्ल्युटी पद्धतीने करण्यासाठी रूपये 3.14 कोटी, ओमकारनगर मंब्रादेवी कॉलनी अंतर्गत युटीडब्ल्युटी पद्धतीने रस्ता तयार करणे रूपये 2 कोटी, साबे गाव येथे आरोग्य केंद्र उभारणे रू. 50 लाख, साबे गाव येथे शाळा व बालवाडी बांधण्यासाठी रू.1.25 कोटी, दातिवली रेल्वे फाटक ते उसरघरपर्यंत 30 मी. रूंदीचा रस्ता तयार करणे. कळवा प्रभाग समिती अंतर्गत विटावा येथील गणेश विसर्जन घाटाचे सुशोभिकरण करणे रू.50 लाख अशा अनेक विकास कामांना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूरी मिळाली आहे.

- Advertisement -

खारेगाव उड्डाणपूल, विटावा येथे पादचारी पूल, विटावा ते ठाणे खाडीवरील पादचारी पूल, दिवा उड्डाणपूल, घोलाई नगर पादचारी पूल तसेच शिवाजीनगर येथील पादचारी पूल, मुंब्रा रेतीबंदर येथे रेल्वे अंडरपास, खारेगाव ते नाशिक महामार्गाला जोडणारा 90 फूटी रस्ता आदी कामांचा यामध्ये समावेश आहे. विटावा येथील क्रिडा संकुलाचे काम सुरू असून खारेगाव येथील उद्याने तसेच सोसायट्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते अशी विकास कामे पूर्ण झाली आहेत. वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून जलवाहतूककरिता पहिल्या टप्प्यातील जेट्टींच्या उभारणीसाठी केंद्र शासनाकडून 100 कोटी रू. जेनपीटीकडे वर्गही करण्यात आले आहेत. कल्याण-ठाणे वसई या जलवाहतूकीच्या पहिल्या टप्प्याचे कामदेखील लवकरच सुरू होणार आहे. ठाणे महापालिकेच्या सल्ल्याने जेएनपीटीमार्फत हे काम होणार आहे. चार लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या झालेल्या दिव्यामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याच्या निषेधार्थ पालिका मुख्यालयासमोर अमोल केंद्रे यांनी दहा दिवस बेमुदत उपोषण केले. त्या उपोषणाची दखल घेतली गेल्याचे त्यांनी सांगितले.

खासदार विकास निधीच्या माध्यमातून या सर्व कामांसाठी पाठपुरावा करित असून नजीकच्या भविष्यकाळात ही विकास कामे पूर्ण होऊन नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.
-खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -