घरमुंबई'८ दिवसांत स्पष्टीकरण द्या', महिला आयोगाचे राम कदमांना आदेश

‘८ दिवसांत स्पष्टीकरण द्या’, महिला आयोगाचे राम कदमांना आदेश

Subscribe

राम कदम यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान केलेल्या बेताल वक्तव्याची दखल आता राज्य महिला आयोगाने घेतली आहे. यासंदर्भात ८ दिवसांत खुलासा करण्याचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत.

दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे भाजपा आमदार राम कदम हे सध्या चर्चेचा विषय बनले असून, भाजपाला देखील डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळेच आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त विधानाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे (स्युमोटो) दखल घेतली असून, आठ दिवसांत आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्यामुळे आता प्रदेश भाजप पाठोपाठ राज्य मगिला आयोगानेही राम कदम यांच्या गंभीर वक्तव्याची दखल घेतल्यामुळे त्यांच्या ते अडचणीत आले आहेत. दरम्यान, लवकरच त्यांचे प्रवक्तेपदही जाणार असल्याची माहिती भाजपच्या गोटातून समोर येत आहे.


वाचा – राम कदम यांच्यासाठी प्रेमवेड्या मजनूंनी पाठवली यादी

- Advertisement -

काय म्हणाले महिला आयोग?

दहीहंडी उत्सवात बोलताना आमदार कदम यांनी महिलांविषयक आक्षेपार्ह आणि बेताल विधाने केली होती. वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून त्याचे वार्तांकन झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कदम यांच्या या वक्तव्याची आयोगाने स्वतःहून दखल घेतली आणि आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ‘महिलांविषयक वक्तव्य करताना आमदार कदम यांनी काळजी घ्यायला हवी होती’, अशी टिप्पणी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यापूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाने कदम यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते राम कदम?

राम कदम यांच्या वक्तव्याचा ५४ सेकंदांचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर शेअर केला होता. ‘साहेब मी तिला प्रपोज केलं. ती मला नाही म्हणतेय. मला मदत करा, या कामासाठीही मी तुमची मदत करायला तयार आहे’, असे राम कदम सांगून बसले. यावर उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे लक्षात येताच राम कदम यांनी स्पष्टीकरण दिले. ‘मी शंभर टक्के मदत करणार. आधी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं. तुमचे आई-वडील म्हटले की, आम्हाला ही पोरगी पसंत आहे. तर काय करणार मी? तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार’, असे त्यांनी सांगितले. ही मुक्ताफळे उधळल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका झाली आणि त्यानंतर उशिरा त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. मात्र अद्याप माफी मागितलेली नाही. त्यामुळे त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशा मागणी होत आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – राम कदम औटघटकेचे भाजप प्रवक्ते; लवकरच होणार उचलबांगडी


प्रदेश भाजपनेही घेतली दखल

राम कदम यांच्या वक्तव्याची दखल प्रदेश भाजपलाही घ्यावी लागली असून त्यांनीही राम कदम यांच्याकडून या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे. याशिवाय यावेळी राम कदम यांनी केलेल्या संपूर्ण भाषणाची सीडी देखील प्रदेश भाजपने मागवली असून ती सीडी पाहून कारवाईचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -