घरमुंबईखड्ड्यांमुळे केडीएमटी,एसटी सेवेलाही ब्रेक !

खड्ड्यांमुळे केडीएमटी,एसटी सेवेलाही ब्रेक !

Subscribe

कल्याणातील खड्डे जीवघेणे बनले असतानाच या खड्ड्यांमुळे परिवहन सेवा आणि एसटी बस सेवेलाही ब्रेक बसला आहे. मुसळधार पाऊस आणि खड्ड्यांमुळे बसेस वाहतूक कोंडीत अडकत असून, ब्रेकडाऊनचे प्रमाणही वाढल आहे. त्यामुळे एसटी सेवा आणि केडीएमटीला दररोज सुमारे दोन दोन लाखांच्या उत्पन्नावर पाणी पडले आहे.

कल्याण एसटी आगारातून दररोज ६६ गाड्या सुटतात. कल्याणहून भिवंडी, मुरबाड, नगर, पनवेल या मार्गे गाड्या धावतात. त्यामुळे हे स्थानक नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते. या आगाराचे साधारण दररोज ७ ते ८ लाख रुपये उत्पन्न आहे. मात्र गेल्या आठवडा भरापासून मुसळधार पाऊस आणि रस्त्यावरील खड्डे याचा प्रचंड फटका एसटीला सहन करावा लागला. कल्याण मुरबाड रस्त्यावर नेहमीच पाणी साठत असल्याने या मार्गावर सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे डेपोतून दररोज ५९ ते ६० च्या आसपास गाड्या बाहेर पडल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. रोजचे सुमारे दीड ते दोन लाख उत्पन्न कमी झालं. केडीएमटीच्या दररोज ७० गाड्या निघतात. कल्याण रिंगरूट बरोबरच आजूबाजूचा ग्रामीण परिसर, वाशी, भिवंडी या मार्गावर परिवहनची सेवा धावते. केडीएमटीचे रोजचे उत्पन्न सुमारे ५ ते साडे पाच लाख रुपये आहे. पावसामुळे व खड्ड्यांमुळे परिवहन सेवेवर

- Advertisement -

परिणाम होऊन तब्बल १० ते १३ गाड्या डेपोतून बाहेर पडत नाहीत. भिवंडी पुलावर वाहतूक कोंडीमुळे अनेक गाड्या वेळेवर पोहचत नाही. त्यामुळे अवघी एकच फेरी होत आहे. त्यामुळं परिवहन सेवेला दररोज दोन लाख रुपयाला फटका सहन करावा लागला आहे.

साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण !

कल्याण रेल्वे स्टेशन समोरच एसटी चे आगार आहे. येथूनच एसटी सुटते, त्यामुळे याठिकाणी दररोज शेकडो प्रवाशांची गर्दी असते. मात्र आगाराच्या प्रवेशद्वारावर पाणी साचल्याने त्यातूनच प्रवाशांना मार्गक्रमण करावे लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशी आणि कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. रस्ता उंच झाल्याने आणि आगार खाली गेल्याने आगारच्या प्रवेशद्वारावरच पाणी साचत असल्याने साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत प्रवाशांना जावे लागत आहे.

पावसाचा फटका एसटी सेवेला सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीत बस अडकून पडल्याने किमी पूर्ण करता येत नाही.त्यामुळे उशीर होतो. साधारण दररोज दीड ते दोन लाखाचे उत्पन्न कमी झालय.
– प्र. स. भांगरे, आगार व्यवस्थापक, कल्याण एसटी डेपो

पाऊस आणि खड्डे यामुळे वाहतूक कोंडीत बस अडकून पडत आहेत. बसेस चे फ्लोरिंग कमी असल्याने व सेन्सॉरही त्या खाली असल्याने पाणी जाऊन बस ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण अधिक आहे. आगारातून कमी बसेस बाहेर पडत असल्याने, साधारण दोन लाख उत्पन्न कमी झालंय.
– मारुती खोडके, परिवहन व्यवस्थापक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -