घरमुंबईत्यांच्या संसारात काय चाललंय हे मी का बघू

त्यांच्या संसारात काय चाललंय हे मी का बघू

Subscribe

भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा टोला

माझ्या बापाने मला, माझ्या संसारात लक्ष द्यायला शिकवले आहे. दुसर्‍यांच्या संसारात काय चाललंय हे बघायला त्यांचा बाप आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केले. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराला होणार्‍या उशिराबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी हे वक्तव्य केले. भाजपची संघटनात्मक बैठक मुंबई रविवारी पार पडली, त्यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

आजच्या बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीच्या हेतूने आढावा घेण्यात आला असून, 2022 ची मुंबई महापालिका निवडणूक स्वतःच्या ताकदीवर लढवणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईचा महापौर भाजपचा व्हावा यासाठी चर्चा केल्याचे देखील ते म्हणालेत. यामध्ये 227 वॉर्ड 36 विधानसभा, आणि 6 लोकसभा मतदारसंघाची माहिती घेतल्याचे सांगत 30 तारखेपर्यंत आम्ही चर्चा करणार आहोत. तसेच 30 तारखेला मुंबईच्या अध्यक्षाची घोषणा होणार असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले.

- Advertisement -

जानेवारीमध्ये निवडला जाणार प्रदेशाध्यक्ष
येत्या 1 ते 5 जानेवारीपर्यंत भाजप प्रदेशाध्यक्षाची नेमणूक होणार आहे. केंद्रातून एक मुख्य नेता येऊन प्रदेशाध्यक्षाची घोषणा करेल. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणूक होतात. पण यावेळी विधानसभा निवडणुकीमुळे आणि सत्ता पेचामुळे या निवडणुका लांबल्या आहेत, असे पाटील म्हणाले. एकनाथ खडसे यांच्या नाराजीबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, नाथाभाऊंनी 1978 पासून भाजपसाठी खालच्या स्तरापासून काम केले आहे. भाजपला सत्तेपर्यंत आणण्यात त्यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.

काल त्यांच्यासोबत माझी एकतास चर्चा झाली. त्यांच्या मुलीला पाडण्याचे काम भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी केले, असा त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे या संदर्भाचे आम्ही पुरावे मागवले असून, ज्यांनी असे काही केले असेल त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई नक्की केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अजित पवार यांना नव्या सरकारची क्लीन चिट
अजित पवार यांना सिंचनप्रकरणी भाजपने क्लीन चिट दिलेली नाही. ज्या केस मागे घेतल्या गेल्या त्यात अजित पवार यांचा काही हस्तक्षेप नव्हता. अजित पवार ज्यामध्ये दोषी आहेत अशा कोणत्याच फाईल भाजप सरकारने क्लीयर केलेल्या नाहीत. जर त्या क्लीयर झाल्या असतील तर त्या आताच्या सरकारने केल्यात, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -