घरताज्या घडामोडीCoronaVirus: अग्निशमन दलांचे जवान देखील रुग्णांलयांचे करणार निर्जंतुकीकरण

CoronaVirus: अग्निशमन दलांचे जवान देखील रुग्णांलयांचे करणार निर्जंतुकीकरण

Subscribe

मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने कस्तुरबा, सेव्हनहिल्ससह चार प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये रासायनिक फवारणी येत आहे.

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये, महापालिका मुख्यालय आणि २४ विभाग कार्यालयांचे आता निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात चार प्रमुख रुग्णालयांसह कस्तुरबा आणि १३ उपनगरीय रुग्णालये तसेच सेव्हनहिल्सचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे करोनाच्या विषाणुंच्या नायनाट यामाध्यमातूनही करण्याचे पाऊल महापालिकेने हाती घेतले आहे. एरव्ही आगींमध्ये किंवा इतर दुघर्टनांमध्ये अडकलेल्यांची जीव वाचवण्यासह मालमत्तांचे नुकसान टाळण्यासाठी तत्पर असणारे अग्निशमन दल आता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठीही रस्त्यावर उतरणार आहे. आपत्कालिन प्रसंगी अग्निशमन दल नेहमीच अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.

पाण्यात सोडियम हायड्रोक्लोराईड मिसळून फवारणी करणार 

राज्यात करोनाच्या विषाणुंचा लागण झालेल्या रुग्णांची संख्या १०१वर पोहोचली असून त्यामध्ये मुंबईतील करोनाच्या रुग्णांची संख्या ४१वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करताना तसेच त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार महापालिकेची सर्व रुग्णालयांसह महापालिकेची कार्यालये आदींचे निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी केईएम आणि नायर रुग्णालयांच्या इमारतींचे प्रथम मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने पाण्यात सोडियम हायड्रोक्लोराईड मिसळून त्यांची फवारणी सर्व रुग्णांलयांच्या परिसरात करण्यात आली. यावेळी रुग्ण बसत असलेल्या आसनांभोवती तसेच टेबल आणि खुर्चीखालीही ही रासायनिक फवारणी करण्यात आली. सध्या सर्व रुग्णांलयांतील ओपीडींमधील संख्या कमी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना रुग्णालयाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फवारणी करणे शक्य होत आहे.

- Advertisement -

या रुग्णालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले

केईएम, शीव, नायर आणि कुपर या चार प्रमुख रुग्णालयांसह साथीच्या आजाराचे कस्तुरबा तसेच वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटर, सांताक्रुझ व्ही.एन.देसाई रुग्णालय, गोरेगाव सिध्दार्थ रुग्णालय, कांदिवली डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, एम.डब्ल्यू.देसाई रुग्णालय, बोरीवली भगवती रुग्णालय, घाटकोपर राजावाडी रुग्णालय, चेंबूर माँ हॉस्पिटल, गोवंडी मदनमोहन मालविया रुग्णालय, विक्रोळी महात्मा ज्योतीबा फुले रुग्णालय, मुलुंड अगरवाल रुग्णालय तसेच करोनाच्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेले अलगीकरण कक्ष असलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयांमध्ये मंगळवारी फवारणी करत तेथील इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

अग्निशमन दलाच्या माध्यमातून ही फवारणी 

यामाध्यमातून सर्व रुग्णालयांमधील करोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, आयाबाई यांच्यासह सफाई कामगार, सुरक्षा रक्षक तसेच रुग्णांनाही याचा दिलासा मिळेल. हे जगावर आलेले संकट असून मुंबई अग्निशमन दलाचे जवान आपले नियमित कर्तव्य पार पाडतानाच दुसरीकडे अशाप्रकारे रुग्णालयांच्या इमारतींचे निर्जंतुकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. अग्निशमन दलाकडे अशाप्रकारची यंत्रणा असल्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीकोनातून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून ही फवारणी केली जात आहे. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख आणि उपायुक्त प्रभात रहांगदळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस भरात सर्व रुग्णालयांचा परिसर निर्जंतुकीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर गुरुवारी महापालिका मुख्यालय आणि २४ विभाग कार्यालयांच्या इमारतींचा परिसर अशाचप्रकारे निर्जंतुकीकरण केले जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: उद्यापासून एपीएमसीतील भाजीपाला मार्केट


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -