घरमुंबईचोरट्यांनी रेल्वे पोलिसाच्या पाकिटावर केली हातसफाई

चोरट्यांनी रेल्वे पोलिसाच्या पाकिटावर केली हातसफाई

Subscribe

ठाणे बोरिवली बसमध्ये एका महिलासह तीन पुरुषांनी चक्क रेल्वे पोलीसाचे पाकिट चोरले.

एका महिलासह तीन पुरुषांनी बसमध्ये गर्दी करून चक्क रेल्वे पोलिसाच्या खिशातील पाकिटावरच हातसफाई केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस बसमधील पाकिटमाराचा शोध घेत आहेत.

नक्की काय घडले?

तक्रारदार ठाणे रेल्वे पोलिस दलातील पोलिस हवालदार आर.एल. पंजवाणी (५७) घोडबंदर रोड येथील वाघबीळ, कावेसर गाव येथे राहतात. १२ डिसेंबर २०१९ रोजी फस्ट शिफ्ट असल्याने सकाळी ६ वाजता ड्युटीवर आले होते. ड्युटी संपल्यानंतर दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास ते ठाणे स्टेशन येथून ठाणे-बोरीवली बसमध्ये बसून घरी जात होते. जवळपास दुपारी ३.५० च्या सुमारास त्याची बस वाघबीळ ब्रीज बसस्टॉपच्या जवळ आल्यावर ते सीटवरून उठून पुढील दरवाज्याच्या जवळ चालत जात होते. त्यावेळी त्यांच्यासमोर एक ५० ते ५५ वर्षीय महिला उभी राहून त्यांना अडवले होते. तर त्याचवेळी तीन पुरुषांनी गर्दी केली. याच अज्ञात चोरट्यांनी पंजवाणी यांच्या खिशातल्या पाकिटावर हातसफाई केली.

- Advertisement -

पाकिटमधून ५ हजार ८९० रुपये चोरीला

बसमधून खाली उतरल्यावर पंजवानी यांच्या मनात संशय आल्याने त्यांनी पँटच्या पाठीमागील खिशात ठेवलेला पाकिटाचा शोध घेतला. तेव्हा पाकीट खिशात नसल्याचे समोर आहे. तो पाकीट त्या चौघांनीच चोरले असल्याचा संशय व्यक्त करत, त्या चौघांविरोधात तक्रार दिली आहे. तसेच त्यांच्या पाकिटमधून ५ हजार ८९० रुपये चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. या घटनेने बसमध्येही पाकिटमार सक्रिय असल्याचे समोर आले असून हे पाकिटमार गर्दी असलेल्या परिवहन बसमध्ये चढून आपले काम फत्तेह करतात असे उघडकीस आले आहे. कासारवडवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा मुंब्रा स्थानकात रूग्णवाहिके अभावी रूग्णाने गमवले पाय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -