घरमुंबईसंप यशस्वी झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

संप यशस्वी झाल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Subscribe

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप यशस्वी झाल्यानंतर आज बेस्ट कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. कृष्णकुंज या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेऊन राज ठाकरे यांचे आभार मानले आहे. साहेब तुम्ही आलात तेच पुष्कळ झालं. त्यानंतर वातावरण बदललं असं सांगत बेस्ट कार्मचाऱ्यांनी राज ठाकरेंचे आभार मानले.

बेस्ट कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आज बेस्ट कर्मचाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. संपात मनसेने दिलेल्या पाठिंब्यानंतर आभार मानण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, राज ठाकरे यांनी कामगारांना सांगितले की, ‘मी म्हणालो होतो राज ठाकरे यांना भेटल्यावर तुमचा प्रश्न सुटेल. आता तुम्ही कोणापुढे झुकू नका’. राज ठाकरे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना तिळगुळ वाटून त्यांचे तोंड गोड केलं. त्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

- Advertisement -

हे वाचा – छगन भुजबळ म्हणतात, “जय महाराष्ट्र” मी देखील शिवसेनेत होतो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -