घरमुंबईखड्डे न बुजवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

खड्डे न बुजवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Subscribe

यंदा जास्त पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून हे खड्डे न बुजवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. पण सर्व यंत्रणांची बैठक गुरूवारी पार पडली होती. त्यामध्ये सर्व यंत्रणांकडून येत्या दहा दिवसात खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. पावसाळा संपताच सर्व यंत्रणांकडून खड्डे बुजवण्याची मोहिम ही प्राधान्याने हाती घेण्यात येईल, असे यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिरंगाई किंवा कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असेही ते म्हणाले.

१० दिवसात खड्डे बुजवण्याचे यंत्रणेचे आश्वासन

रायगड, ठाणे, पालघर याठिकाणच्या पालकमंत्री तसेच सर्व पालिकांचे आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जेएनपीटी, एमएसआरडीसी यासारख्या सगळ्या यंत्रणांच्यासोबत गुरूवारीच बैठक पार पडली. या वर्षीचा पाऊस प्रमाणापेक्षा जास्त होता. त्यामुळे तात्पुरती डागडुजी म्हणून पेव्हर ब्लॉक, कोल्ड मिक्सच्या माध्यमातून रस्त्याच्या डागडुजीची कामे करण्यात आली आहेत. पण पाऊस कमी झाल्यावर नक्कीच खड्डे बुजवण्याच्या मोहिमला वेग येईल, असे शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्री तसेच लोक प्रतिनिधींनी आपल्या भागातील खड्डयांबाबतचा विषय या बैठकीत मांडला होता. त्यावेळी सर्व यंत्रणांकडून खड्ड्यांच्या विषयावर तातडीने काम करण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – शाळांच्या देखभाल, स्वच्छतेसाठी निविदा न काढताच कंत्राट

नवरात्री आधीच अनेक ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीची कामे सुरू करण्यात येतील. सध्या फक्त पावसाचा अडथळा आहे. सप्टेंबर संपत असतानाही पावसाची हजेरी कायम आहे. त्यामुळेच रस्त्याच्या खड्डे बुजवण्याच्या कामे करण्यासाठी अडचणी येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आरजे मलिष्कापासून ते विविध सेलिब्रिटींनी मुंबई आणि महानगर क्षेत्रात ठाणे, डोंबिवली परिसरात रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांमुळे प्रवासाची गैरसोईची व्यथा सोशल मिडिया तसेच माध्यमांसमोर मांडली होती. त्यामुळेच ठिकठिकाणाहून तक्रारीचा पाढा नागरिकांनी वाचल्यानंतर सर्व यंत्रणांची नुकतीच बैठक घेण्यात आली.


हेही वाचा – स्थायी समितीने बैठकींचा रचला विक्रम

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -