घरमुंबईएसटीचे वर्षभरात ३७५ अपघात

एसटीचे वर्षभरात ३७५ अपघात

Subscribe

सुरक्षित प्रवासाचा दावा ठरतोय फोल

गावात पोहोचलेल्या एसटीचा प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास अशी ख्याती असलेल्या एसटीच्या अपघातात वाढ झाल्याचा विरोधाभास समोर आला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ३७५ एसटीच्या बसगाड्यांचे झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडून ‘सुरक्षित प्रवास’ असा जो दावा केला जात आहे, तो फोल ठरताना दिसून येत आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सुमारे १८ हजार बसगाड्या आहेत. त्यात साधी, लालपरी, शिवशाही, शिवनेरी अशा बसगाड्यांचा समावेश आहे. दररोज सुमारे ६३ लाख प्रवाशांची ने-आण एसटीमार्फत केली जाते. ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ हे एसटीचे ब्रीदवाक्य आहे. लांबचा प्रवास आणि वाहतूक कोंडीतून वाट काढणार्‍या एसटीच्या चालकांकडून होणारे अपघात शुन्यावर आणण्यासाठी महामंडळातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहे. मात्र एसटीच्या दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत जात असल्यामुळे एसटीच्या विशेष प्रयत्नांना अपयश येत आहे. परिवहन मंत्र्यांनी राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सच्या वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या ताफ्यात शिवशाही बसगाड्या आणल्या आहेत. मात्र आता याच बसगाड्यांनी अपघात वाढत आहेत.

- Advertisement -

कोर्टातील दावे मात्र रोडावले
एसटी महामंडळाने अपघात सहायत्ता निधीमध्ये वाढ केली आहे. अपघातातील मृतांच्या वारसाला १० लाख रुपये, गंभीर जखमींना ५ लाखांपर्यंत तर किरकोळ जखमींना २.५० लाखांपर्यंत आर्थिक मदत केली जाते. तसेच हॉस्पिटलातील वैद्यकीय खर्च दिला जातो. त्यामुळे अपघातांच्या दाव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे

वर्ष- अपघात
२०१४- १५ ३,१७२
२०१५- १६ २,९२०
२०१६-१७ २,७७२
२०१७-१८ २,९३३
२०१८-१९ ३,३०८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -