घरमुंबईगोवर - रुबेला लसीचा विद्यार्थीनीला त्रास, सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू

गोवर – रुबेला लसीचा विद्यार्थीनीला त्रास, सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू

Subscribe

गोवर - रुबेला या लसीमुळे एका विद्यार्थीनीला त्रास होत असल्याचा आरोप विद्यार्थीनीच्या पालकांनी केला आहे. या विद्यार्थीनीवर सायन रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

गोवर – रुबेला या आजाराचं समुळउच्चाटन व्हावं, यासाठी भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. पण, मोहिम सुरू झाल्यानंतर आतापर्यंत या मोहिमेला कमी-अधिक प्रमाणात विरोध दर्शवला जात आहे. ही लस घेतल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याच्या घटना ही सोलापूर, पुणे या शहरांमध्ये घडल्या असल्याचं समोर आलं आहे. अशीच एक घटना सायन कोळीवाड्याच्या गुरुनानक शाळेतील एका विद्यार्थीनीसोबत घडली आहे. या मुलीला रुबेला लस दिल्यानंतर तिला त्रास झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. शिवाय, याबाबतचा मेसेज ही सध्या व्हायरल होत आहे.

विद्यार्थींनीला उलट्या आणि जुलाबचा त्रास

गुनगुन प्रजापती (१०) असं या मुलीचं नाव असून ती सायनच्या गुरुनानक पालिकेच्या शाळेत शिकत आहे. २९ नोव्हेंबरला या शाळेत लसीकरण करण्यात आलं होतं. तिला त्याच दिवशी सायंकाळी ५ च्या दरम्यान उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला. त्यानंतर तिला जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलं. पण, तरीही बरं वाटत नव्हतं. आणखी काही रुग्णालय फिरल्यानंतर सोमवारी ३ डिसेंबरला तिला वडीलांनी अखेर सायन रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे.

- Advertisement -

वाचा – भारतातील ४२ कोटी मुलांचं होणार गोवर-रुबेला लसीकरण


विद्यार्थीनींला न्यूमोनियाचं इन्फेक्शन

पण, याविषयी सायन रुग्णालयामधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी एक केस रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे. पण, तिला गोवर आणि रुबेलाच्या लसीकरणामुळे त्रास झाला असं सांगता येणार नाही. कारण, तिला न्यूमोनियाचं इन्फेक्शन आहे. त्यासोबत तिला घशाचंही इन्फेक्शन झालं आहे. पण, या लसीमुळे काही त्रास होतो आहे असं निदर्शनास आलेलं नाही.

- Advertisement -

गोवर – रुबेला लसीकरणानंतर न्यूमोनिया होऊ शकत नाही. न्यूमोनिया होण्यासाठी किमान १० ते १२ दिवस लागतात. त्यामुळे कदाचित तिला आधी थोडं इन्फेक्शन असू शकतं. त्यामुळे, गोवर-रुबेला लसीमुळे न्यूमोनिया होणं ही शक्यता अजिबात नाही आहे. मुलांना त्रास होतो आहे. पण, तो त्रास १ तासापुरताच असू शकतो.  – डॉ. संतोष रेवणकर, संयुक्त आरोग्य संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग

२९ तारखेच्या दिवशी गुनगुनला शाळेतच गोवर-रुबेलाची लस देण्यात आली होती. काही तासानंतर तिला हा त्रास सुरू झाला. तिला उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास झाला. त्यामुळे तिला आधी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. पण, तिथे तिला बरं वाटत नव्हतं आणि आता तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण, तिला गोवर-रुबेला लसीकरणामुळेच हा त्रास तिला होत आहे.  – तारकेश्वर प्रजापती, गुनगुनचे वडील


वाचा – सोलापूर येथे ४१ शाळांचा गोवर – रुबेला लस घेण्यास नकार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -