घरमुंबई'अगोदर रोजगार द्या, मग प्रवेश वाढवा'

‘अगोदर रोजगार द्या, मग प्रवेश वाढवा’

Subscribe

राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आयटीआच्या विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड.अमोल मातेले यांनी टीका केली आहे. त्यांनी सरकारला अगोदर रोजगार देण्याचा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्राचे कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी बुधावरी राज्यातील आयटीआयमध्ये शिक्षण घेऊ इच्छिनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून आयटीआयमध्ये ५० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यांच्या या घोषणेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका केली जात आहे. कामगार मंत्र्यांची ही घोषणा फसवी असल्याचे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले म्हणाले आहेत. भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात येऊन चार-साडेचार वर्षात दोन कोटी तरुणांना रोजगार देणार होते. परंतु, सरकाराने प्रत्यक्षात किती तरुणांना नोकऱ्या दिल्या, असा सवालही त्यांनी भाजप सरकारला विचारला आहे.

हेही वाचा – विद्यापीठाच्या कामगार विभागावर कारवाईची मागणी

- Advertisement -

अगोदर रोजगार द्या – मातेले

अमोल मातेले म्हणाले की, भाजप सरकार लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन तरुणांची फसवणूक करत आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन भाजपने ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ, अशी पोकळ घोषणा केली आहे. पण अगोदर तरुणांना रोजगार निर्माण करा. मग प्रवेश देण्याच्या बाता मारा, असा टोला मातेले यांनी सरकारला लगावला आहे. त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, मागील काही वर्षात आयटीआयमध्ये किती विद्यार्थीना रोजगार दिला? आपण एका राज्याचे जबाबदार मंत्री आहात. एक वेळ प्रवेश द्याल. पण ते विद्यार्थी आयटीआय पूर्ण करून बाहेर पडतात, तेव्हा त्यांना रोजगार मिळत नाही. ही आपल्या राज्याची शोकांतिका आहे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचा दावा : विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात कर्मचारी राहतात

- Advertisement -

‘एक कलमी कार्यक्रम बंद करा’

अँड.अमोल मातेले यांनी कामगार नेते संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, ‘आयटीआय करणारे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आसतात. नोकरी हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आसते. पण आपल्याला त्याचा विसर पडून फक्त पोकळ घोषणा करण्यामध्ये आपण मशगुल आहात. यातून आपण काहीतरी नवीन काम केल्याची भावना तयार करता आणि तरुणाची दिशाभूल करतात. मते मिळवणे हा एक कलमी कार्यक्रम चालू आहे. ते आता बंद करा. नाही तर हा तरुण उद्या हातात धोंडा घेऊन मारल्याशिवाय राहणार नाही’. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा उद्देश साध्य होणार नाही, असेही मातेले म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -