घरमुंबईआता विद्यार्थीही ग्राहक मंचाकडे मागू शकतात दाद

आता विद्यार्थीही ग्राहक मंचाकडे मागू शकतात दाद

Subscribe

शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना लुबाडत असतील तर त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार ग्राहक मंचाने विद्यार्थ्यांना दिला आहे.

एखादा दुकानदार किंवा विक्रेता ग्राहकांना लुबाडत असेल तर त्याच्याविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. ग्राहक मंच यावर योग्य ती कारवाई करुन संबंधीत विक्रेत्याला वठणीवर आणते. आता या ग्राहक मंचाकडे विद्यार्थी देखील आपल्या शाळेविषयी तक्रार नोंदवू शकतात, अशी माहिती ग्राहक मंचाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांचे फिज जास्तीने घेऊन विद्यार्थ्यांवर मुजोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. याप्रकरणी मुंबईमध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर विद्यार्थी देखील ग्राहकच असतो असा निर्णय देण्यात आला होता. त्यामुळे ग्राहक मंचाने या निर्णयाचे स्वागत करत विद्यार्थीही ग्राहक असल्याचे मान्य केले आहे.

हेही वाचा – महागाईमुळे सुक्या मेव्याकडे ग्राहकांची पाठ

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

मुंबईच्या गोरेगाव येथील ओबेरॉय इंटरनॅशनल शाळेतील एका विद्यार्थ्याने शाळेची फीज भरली नाही म्हणून शाळेने त्याला परिक्षेस बसू दिले नव्हते. त्यामुळे त्या विद्यार्थ्याने ग्राहक मंचाकडे धाव घेतली होती. ग्राहक मंचाने सुरवातीला या विद्यार्थ्याची तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. विद्यार्थी ग्राहक म्हणता येणार नाही, असे ग्राहक मंचाचे मत होते. त्यामुळे ग्राहक मंचाने विद्यार्थ्याची तक्रार दाखल करुन घेतली नाही. विद्यार्थ्याने यासंदर्भात याचिका दाखल केली. या याचिकेचा निर्णय विद्यार्थ्याच्या बाजूने लागला. हे निर्णय दाखवल्यानंतर ग्राहक मंचाने विद्यार्थी हा ग्राहक असतो, असे मान्य केले आहे. त्यामुळे आता शाळा किंवा कॉलेजने कुठल्याही नियमांचे उल्लंघन केले तर त्यांच्या विरोधात ग्राहक मंच योग्य ती कारवाई करणार आहे.


हेही वाचा – बँकांची Fake Apps चोरतात ग्राहकांचा डेटा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -