‘सुरक्षित, दर्जेदार इलेक्ट्रिक साधन निर्मितीवर कंपन्यांनी भर द्यावा’

इलेक्ट्रिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेची सर्व मानके आणि दर्जा टिकवण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

Mumbai
Subhash Desai
Subhash Desai

इलेक्ट्रिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरक्षेची सर्व मानके आणि दर्जा टिकवण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. मुंबई येथे पॉवर केबल अलायन्सची स्थापना करण्यात आली. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देसाई बोलत होते. यावेळी पॉवर केबल अलायन्सचे देशभरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. इलेक्ट्रिक वस्तू अधिक सुरक्षित करण्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. असुरक्षित इलेक्ट्रिक उपकरणामुळे किंवा त्रुटीमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. देशात विजेचा धक्का लागून किंवा अपघात होऊन दिवसाला ६० हून अधिक व्यक्तिंचे बळी जात आहेत. सदोष वीज वाहिन्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात होत आहेत, यातून मोठ्या प्रमाणत जीवित आणि वित्त हानी होते. हे टाळण्यासाठी पावर केबल अलायन्स आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दर्जेदार उत्पादने तयार करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे देसाई यावेळी म्हणाले.

हेही वाचा – अशोक चव्हाणांकडून इतके अज्ञान अपेक्षित नव्हते – सुभाष देसाई

नेमकं काय म्हणाले सुभाष देसाई?

वीज पुरवठा व उत्पादन कंपनी प्रतिनिधींच्या याबाबत काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी राज्य शासन तयार आहे. खासगी कंपन्यांसोबत बैठक घेण्याची तयारी देसाई यांनी यावेळी दर्शविली. औद्योगिक वसाहतीमध्ये आगीच्या घटना टाळण्यासाठी उद्योग विभागाने उद्योगांना फायर एनओसी देण्यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून याबाबत कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे देसाई यांनी सांगितले. वीज सुरक्षेसाठी पीसीएने घेतलेल्या पुढाकाराचे देसाई यांनी कौतुक केले आणि संघटनेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा – सुभाष देसाईंना बदनाम केल्याप्रकरणी शिवसेनेची तक्रार दाखल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here