घरट्रेंडिंगडॉक्टर ठरले तारणहार... आठ दिवसाच्या बाळाच्या ह्दयातील २० टक्के ब्लॉकेजची यशस्वी शस्त्रक्रिया

डॉक्टर ठरले तारणहार… आठ दिवसाच्या बाळाच्या ह्दयातील २० टक्के ब्लॉकेजची यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

बाळामध्ये असलेला दुर्मिळ हदयदोष दुर करण्यासाठी वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी बलून एओर्टिक वाल्वोटॉमी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून बाळाला जीवनदान मिळाले.

जगभरात कोरोनाचे संकट पसरले असून या काळात जन्मलेल्या बाळांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अहमदनगरमध्ये जन्मलेल्या बाळाला आठवड्याभरातच श्वास घेण्यात अडथळे येऊ लागल्याने त्याचे पालकांनी बाळाला घेऊन मुंबईतील बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटल गाठले. बाळामध्ये असलेला दुर्मिळ हदयदोष दुर करण्यासाठी वाडिया हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी बलून एओर्टिक वाल्वोटॉमी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून बाळाला जीवनदान मिळाले.

अहमदनगर येथे राहणार्‍या जोडप्याला घरी बाळाचे आगमन झाल्याचा प्रचंड आनंद झाला होता. बाळाचे वजनही निरोगी बाळाप्रमाणेच २.५ किलो इतके होते. तसेच कोरोना सारख्या संकटकाळी देखील बाळ सुखरुप जन्माला आल्याने संपुर्ण कुटुंब खुश होते. मात्र जन्मानंतर आठवड्याभरातच बाळाला स्तनपानावेळी श्वासोच्छवासात अडचणी येऊ लागल्या. बाळाच्या पालकांनी त्वरित जवळील बालरोगतज्ञांची भेट घेतली. त्यावेळी इकोकार्डियाग्राफी तपासणी दरम्यान बाळाच्या श्वासाचा वेग वाढणे तसेच हदयदोष आढळून आला. तसेच बाळाच्या महाधमनीत ब्लॉकेज दिसून आले. बाळाच्या पालकांनी त्याला त्वरीत बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटलमध्ये आणले. त्यावेळी बाळाचा हार्ट पंपिंग रेट १५ ट्क्के इतका कमी असून सर्वसामान्यांमध्ये तो कमीतकमी ५५ टक्के इतका असतो. बाळाची प्रकृती खालावली होती. बालरोग कार्डियक एनेस्थेटिस्ट, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, नर्सिंग आणि तांत्रिक टीमसह कार्डियाक टीमने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरेक्षेविषयी आवश्यक ती सारी खबरदारी घेत बाळाची शस्त्रक्रिया केली. बाळाला त्वरित आयसोलेशन युनिटमध्ये दाखल केले. श्वासोच्छवासाच्या तीव्र अडचणी लक्षात घेता व्हेंटिलेटरवर ठेवले. हा जन्मजात दोष लोकसंख्येच्या 2 टक्के बाळांमध्ये दिसून येतो. त्यापैकी 15 ते 20 टक्के हदयाच्या झडपा ब्लोकेज, तर 25 टक्के बाळांमध्ये जन्माच्या 1 महिन्यानंतर ही स्थिती पहायला मिळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

- Advertisement -

बाळाची शस्त्रक्रिया झाली असून बलून एओर्टिक वाल्वोटॉमी किंवा बलून एओर्टिक व्हॅल्व्हुलोप्लास्टीमध्ये डिफिलेटेड बलूनसह कॅथेटरचा वापर करून ह्रदयाचा कॅथेटरिझेशनद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. ही शस्त्रक्रिया 2 तास चालली. त्यानंतर इकोकार्डिओग्राफीने हृदय पंपिंग क्षमतेत त्वरित सुधारणा दर्शविली. बाळाची कोरोना चाचणी निगेटिव्ह तर आईची पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिला आयसोलेशनच्या कारणास्तव कस्तुरबा रुग्णालयात हलवावे लागले. त्यानंतर बाळाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. बाळाला लवकरच घरी सोडण्यात येईल.

पहिल्या बाळाच्या जन्मानंतर आम्हाला आनंद झाला. त्याला हृदय दोष असल्याचे निदान झाले तेव्हा मात्र आम्हाला धक्का बसला. वाडिया हॉस्पीटलमध्ये वेळेवर व तातडीने उपचार मिळाले नसते तर आम्ही बाळाला गमावले असते. बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्न उल्लेखनीय आहेत. असे बाळाच्या वडिलांनी सांगितले.

वाडियामध्ये आम्ही कोरोना संसर्ग झालेल्या मुलांबरोबरच इतर गंभीर दोष असलेल्या मुलांच्या उपचारासाठी विशेष खबरदारी घेतो. यशस्वी उपरांच्या माध्यमातून आमचे डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांच्या टीमची क्षमता आणि आरोग्य सेवा पुरविण्यातील उत्कृष्टता दिसून येते.
डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया ग्रुप ऑफ हॉस्पिटल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -