सीआयएसएफच्या जवानाची गोळी झाडून आत्महत्या

सांताक्रुज येथील घटना, आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही

Mumbai
suicide by gunshot
गोळी झाडून आत्महत्या

सीआयएसएफच्या एका जवानाने शनिवारी सकाळी सांताक्रुज परिसरात आपल्या सर्व्हिस रायफलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. भँवरलाल नायक असे या 42 वर्षीय जवानाचे नाव असून त्याच्या आत्महत्येची माहिती सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम कोरेगावकर यांनी सांगितले.

नायक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. भँवरलाल नायक हे मूळचे राजस्थानचे रहिवाशी असून ते सीआयएसएफमध्ये जवान म्हणून दिल्लीत कार्यरत होते. अलीकडेच त्यांची मुंबई शहरात बदली झाली होती. बदलीचे आदेश प्राप्त होताच रात्री उशिरा ते मुंबईत आले होते.

त्यांची नेमणूक सध्या सामाजिक कार्यकर्ता आणि एनजीओ तिस्ता सेटेलवाड यांच्या सांताक्रुज येथील बंगल्यात होती. सकाळी दहा वाजता ते तिथेच कर्तव्य बजावित होते. यावेळी त्यांनी एका सहकार्‍याला आपण एका महत्त्वाच्या कामासाठी जात असल्याचे सांगून निघून गेले. काही वेळाने त्यांनी तिथेच त्यांच्या सर्व्हिस रायफलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here