घरमुंबई'आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही; पण प्रविण चौगुलेच्या स्वामी निष्ठेला सलाम'

‘आत्महत्येचे समर्थन होऊ शकत नाही; पण प्रविण चौगुलेच्या स्वामी निष्ठेला सलाम’

Subscribe

प्रविण चौगुले याच्या स्वामीनिष्ठेला सलाम करत जितेंद्र आव्हाड यांनी पक्षबदलूंचे कान पिळले आहेत.

”सध्या राज्यात पळवापळवी सुरु असतानाच विटाव्यातील प्रविण चौगुले या तरुणाने आपल्या नेत्याला त्रास होतोय म्हणून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे समर्थन करणार नाही. पण, त्याने दाखवून दिलेली ही स्वामीनिष्ठा महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारी आहे. त्यामुळे त्याला माझा सलाम आहे,” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रविण चौगुले या तरुणाला आदरांजली अर्पण केली आहे. दरम्यान कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यामुळे मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

येथे पाहा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा व्हिडीओ – राज ठाकरे नशीबवान, प्रवीण चौगुलेसारखे कार्यकर्ते मिळाले

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

राज ठाकरे यांना इडीची नोटीस आल्यानंतर अस्वस्थ झालेल्या विटाव्यातील प्रविण चौगुले याने आत्मदहन केले. याबाबत आमदार आव्हाड यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पोस्ट करुन प्रविण चौगुले याला आदरांजली अर्पण केली आहे. आमदार आव्हाड म्हणाले की, ”जागोजागी निष्ठेची विष्ठा होताना दिसतेय; पळवा-पळवी सुरु आहे. ४०-४० वर्षं लोकं सत्तेत आहेत. ते आता सोडून जाताहेत; अन् अचानक बातमी येते की प्रविण चौगुले नावाच्या मनसैनिकाने आत्महत्या केली. आपल्या नेत्याला त्रास होतोय; आपला नेता अस्वस्थ आहे. आपला नेता कुठे तरी अडचणीत आहे. ही अस्वस्थता त्याला इतकी सतावत होती की त्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणे चूकचे आहे; त्याचे समर्थन करीत नाही. पण, ही स्वामीनिष्ठा कुठे बघायला मिळणार? आपल्या नेत्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर; आपल्या नेत्याला काही होता कामा नये, ही भावना आजच्या युगामध्ये दिसते कुठे? खासकरुन महाराष्ट्रात जे काही चालू आहे. तिथे तर ही निष्ठा दिसतच नाही. प्रविण चौगुलेकडे सत्ता नाही, पैसा नाही, आधार नाही. घर नाही; मायबाप नाही; काही नाही. पण, फक्त नेत्याच्या प्रेमापोटी या माणसाने आपला जीव दिलाय. निष्ठेचे एवढे मोठे उदाहरण मी गेल्या कैक वर्षात पाहिलेले नाही. ‘सलाम प्रविण चौगुलेला अन् नशीबवान राज ठाकरे!’ महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रविणने वेगळी दिशा दिली आहे. बघूया पुढे काय होतेय?, असेही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवरून मनसेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची आत्महत्या

का केली प्रविणने आत्महत्या?

कोहिनूर मिल खरेदी प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. २२ ऑगस्ट रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उभे राहावे, असे आदेश‌ ईडीकडून देण्यात आले आहेत. मात्र, ईडी चौकशीच्या आधीच ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मनसेचा निष्ठावंत कार्यकर्ता प्रवीण चौगुलेने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री उशिराने ठाण्यात घडली. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवल्यामुळे आपण आत्महत्या करत आहोत, असे प्रवीणने आपल्या मित्रांना आत्महत्येपूर्वी सांगतले होते. राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे तो प्रचंड तणावात गेला होता. त्याने सोशल मीडियावर देखील तशाप्रकारचे पोस्ट टाकले होते. अखेर प्रचंड तणावाखाली त्याने रात्री उशिरा आत्महत्या केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -