सुजय डहाके यांच्या ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ वेबसीरिजची घोषणा

झी ५ ने आपली नवीन मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाकेने या सीरिजचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन केले आहे.

Mumbai
sujay dahake
दिग्दर्शक सुजय डहाके (सौजन्य-सोशल मीडिया)

५ नोव्हेंबर २०१८ म्हणजेच मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून झी ५ ने आपली नवीन मराठी ओरिजिनल वेब सिरीज ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ची घोषणा केली आहे. कॉलेज लाईफमधील एकांकिका स्पर्धा, पडद्यासमोरील तसेच पडद्यामागील नाट्य, यांच्याबरोबरीनेच सहा कॉलेज विद्यार्थ्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ असे या मालिकेचे कथानक असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सुजय डहाकेने या सीरिजचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन केले आहे. लवकरच या वेबसीरिजबद्दलची अधिक माहिती तसेच यामध्ये काम करणार्‍या कलाकारांची घोषणा करण्यात येईल.

झी ५ बरोबर ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ या माझ्या पहिल्या वेब सिरीजची निर्मिती करताना मला अतिशय आनंद होत आहे. आजच्या काळातील, आजच्या तरुणाईची ही कथा आहे. एकांकिका आणि नाटक हे मराठी लोकांचे विशेषतः मराठी तरुणांचे आवडते विषय. मात्र या शोमध्ये या विषयाला अतिशय वेगळ्या पध्दतीने दर्शवण्यात आले आहे. आजचा मराठी तरुण जागृत, संवेदनशील, जोशपूर्ण तर आहेच पण याबरोबरीनेच आपल्या मुळाशी इमान राखून आहे. या शोच्या माध्यमातून मराठी तरुणाईला, त्यांच्या कॉलेज जीवनाला एका अनोख्या हटके पध्दतीने दाखविण्यात येईल. उच्च निर्मितीमूल्य असलेली ही वेब सीरीज सर्व वयोगटातील प्रेक्षकांना निश्चितच आवडेल याची मला खात्री आहे.
– सुजय डहाके, दिग्दर्शक

दहा भागांची एक मालिका असणार आहे

आपल्या दृश्यात्मक कथांसाठी प्रसिध्द असलेल्या सुजय डहाके यांनी आजवर वेगवेगळ्या प्रकारचे विषय हाताळले असून त्यांच्या चित्रपटांमध्ये ‘शाळा’, ‘आजोबा’ आणि ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे. तर आता ‘सेक्स,ड्रग्ज & थिएटर’ च्या माध्यमातून सुजय डिजीटल वेबसिरीजच्या माध्यमात प्रवेश करत आहे. ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ सहा कॉलेज विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारीत असून त्यांना प्रसिध्द अशा नाट्य स्पर्धेत भाग घ्यावा लागल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय नाट्य घडते हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. साधारण दहा भागांची ही मालिका असून यामध्ये नवीन तरुण कलाकारांचा समावेश असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here