अखेर सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश; काँग्रेसला भगदाड

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला.

Mumbai
sujay vikhe patil
सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी अखेर भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेतला. आज, मंगळवारी मुंबईतील गरवारे इंस्टिट्युटच्या जवळील एमसीए सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुजय यांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देताना, हा निर्णय आपण आईवडिलांच्या विरोधात जाऊन करत आहोत, अशी कबूली दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव असूनही सुजय भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने सर्वांच्याय भुवया उंचावल्या होत्या. मात्र माझ्या संकटाच्या काळात ज्यांनी मला साथ दिली. त्यांच्यासोबत मी आहे, असेही सुजय यावेळी म्हणाले. वडिलांच्या विरोधात जाऊन भाजप प्रवेशाचा निर्णय घेतल्यामुळे, अशावेळी माझ्यावर फार मोठी जबाबदारी असल्याचे सुजय म्हणाले. भाजपची भूमिका ही डॉ. सुजय विखे पाटलाची वैयक्तीक भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. शिवाय नगरमधील दोनही खासदारकीच्या जागा जिंकून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

sujay vikhe patil
सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश

नगरमध्ये पक्षवाढीचे काम करणार 

भाजपमधील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, बबनराव पाचपुते, सदाभाऊ खोत, राज पुरोहित यांच्यासह सुजय पाटील यांचे अनेक समर्थक उपस्थित होते. भाजप प्रवेशाबाबत सुजय यांनी मुख्यमंत्र्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार मानले. भाजपने आपल्याला कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी दिली, असा उच्चार यावेळी त्यांनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पक्षाचा झेंडा सुजय यांच्या हातात देऊन अधिकृत पक्षात घेतले. मुख्यमंत्र्यांनी माझ्या वडिलांची जागा त्यांनी बजावली. माझ्या संकटाच्या काळात ज्यांनी मला साथ दिली. त्यामुळे नगरमध्ये भाजप वाढीचं काम करणार असल्याची ग्वाही यावेळी सुजय यांनी दिली.

सुजय विखे पाटलांना नगरमधून उमेदरवारी

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती अखेर सुजय विखे पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला नुसतच प्रवेशच नाही केला तर नगरमधून सुजय यांचे नाव दिल्लीत पाठवल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत सुजय विखे यांची नगरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षात येतांना सुजय यांनी कोणतेही अट घातलेली नाही. मात्र सुजय हे एक चांगलं नेतृत्व होऊ शकते. आम्ही खासदार उमेदवार म्हणून दिल्लीत पाठवत आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. नगर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यास नकार दिल्यामूळे नाराज सुजय यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान, काल भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी सुजय यांच्या भाजपा प्रवेशाला विरोध केला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विरोध झुगारून चक्क सुजय यांचे नाव घोषित केले. एवढंच नाही तर नगर हा भाजपाचा बालेकिल्ला झाला पाहिजे, असे देखील मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच सुजय यांनी थोडं बंड करून हा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय बरोबर होता हे काही दिवसांनी त्याच्या घरीदेखील सुद्धा लक्षात येईल, असे त्यांनी सांगत नगरमधील जागा आम्ही रेकॉर्ड मताने निवडून आणू. २०१४ पेक्षा जास्त जागा आम्ही येत्या निवडणुकीत जिंकू, ४५ जागा येतील असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here